Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती संभाजी महाराजांची जयंती निमगावात उत्साहात

शिर्डी प्रतिनिधी ः राहाता तालुक्यातील निमगाव को येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती अतिशय उत्साहात व जल्लोषात साजरी झाली. या उत्सवाचे नियोजन राजमुद्

साई खेमानंद फाउंडेशन च्या माध्यमातुन बेलापूर ला तातडीने कोविड सेंटर चालू करावे : प्रफुल्ल डावरे
एटीएममध्ये हातचलाखी, अडीच लाख लांबवले
निवडणुकीत बहुमत म्हणजे धार्मिक बहुमत नव्हे…: अ‍ॅड. असीम सरोदे यांचे प्रतिपादन

शिर्डी प्रतिनिधी ः राहाता तालुक्यातील निमगाव को येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती अतिशय उत्साहात व जल्लोषात साजरी झाली. या उत्सवाचे नियोजन राजमुद्रा प्रतिष्ठान यांनी केले होते. गावातील ज्येष्ठ, तरुण, लहान, सर्वांना एकत्रित करून सागर विजयराव कातोरे पाटील यांनी अतिशय उत्साहात जयंती सालाबाद प्रमाणे साजरी केली, यावेळी आलेल्या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
गावातील सर्व जयंती उत्सवाला समस्त ग्रामस्थ एकत्रित होऊन आनंदाने हे उत्सव साजरे करत असतात, असे उत्सव गावात होणे ही काळाची गरज आहे यातूनच इतिहासाची पाने उलगडली जाऊन लहान मुलांपुढे या इतिहासाचं अवलोकन केलं जातं भावी पिढीला हा इतिहास कळण्यास मदत होते महाराजांचे शौर्य महाराजांचे कार्य याची उजळणी जणू या कार्यक्रमांमधून होत असते या उत्सवामध्ये अनेक मान्यवरांनी युवकांनी आपापले अभिवादन पर मनोगत व्यक्त केले अनेक युवकांनी महाराजांच्या इतिहासाची आठवण करून दिली,निमगाव येथील भक्ती व श्रद्धा या भगिनींनी अतिशय सुंदर मनोगत व्यक्त केले, रुई गावातील शाहीर खरात यांनी भारदार आवाजात पोवाडा सादर केला.
या कार्यक्रमास राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजयराव कातोरे, सुखदेव बारहाते, विविध विकास कार्यकारी सोसायटी संचालक गुलाब काका गोसावी, उत्तमराव खरात, धोंडीराम खरात, गोपीनाथ मते, बबनराव वालझाडे शिवाजी आण्णा कातोरे, रावसाहेब जगताप, संदीप कातोरे, साई मल्हार प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास कातोरे पा. उपसरपंच अजय जगताप, ओबीसीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर माजी उपसरपंच राजेंद्र गाडेकर, विविध कार्यकारी सोसायटी निमगावचे व्हाईस चेअरमन रघुराज कातोरे पाटील मा ग्रामपंचायत सदस्य धनंजय पाटील ग्रामपंचायत सदस्य मनोज वदक ओबीसी नेते खंडेरावांना कडलग सामाजिक कार्यकर्ते सतीश डेंगळे सरकार सिकंदर भाई शेख शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख भानुदास रावसाहेब कातोरे शाखाप्रमुख सागर कातोरे उपशाखाप्रमुख प्रदीप खरात,तालुका समन्वयक प्रवीण कातोरे, गोरख भाऊ वदक, नारायण रायभाने आदी ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे राजमुद्रा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते यांनी हा कार्यक्रम पार पाडावा म्हणून अतिशय परिश्रम घेतले, सर्वजणांनी एकोप्याचे दर्शन या कार्यक्रमाच्या वेळी घडवुन आणले यावेळी सूत्रसंचालन युवा सेनेचे उपतालुकाप्रमुख गोकुळ विश्राम ठुबे यांनी केले.

COMMENTS