राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश,रखडलेल्या  कामाला सुरुवात

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश,रखडलेल्या कामाला सुरुवात

कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरातील बैलबाजार हा रस्ता शहरातील विविध उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे.

ऊस बेणे विक्रीसाठी ‘सोशल मिडीया’चा वापर | आपलं नगर | LokNews24 |
मुस्लिम आरक्षण एल्गार मोर्चाला सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठिंबामोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन-डॉ.गणेश ढवळे
घराचा दरवाजा तोडून दागिने घेवून चोरटे पसार  

कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरातील बैलबाजार हा रस्ता शहरातील विविध उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. उपनगरातील नागरिकांसाठी हा सोयीचा मार्ग असून ह्या रस्त्याचे काम जवळपास एक वर्षापासुन बंद पडलेले होते. या रखडलेल्या रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या मोठमोठ्या कपारी आणि पडलेल्या खड्यांमुळे तसेच स्पिडब्रेकर नसल्याने सतत अपघात घडत होते. मागील सात आठ महिन्यांपासुन आमदार आशुतोषदादा काळे यांच्या मार्गदर्शना खाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी हे या कामासाठी पाठपुरावा करत होते. गेल्या डिसेंबर महिन्यात नगरपालिकेला निवेदन देऊन रस्त्याच्या कामाची मागणी करण्यात आली होती. व वारंवार नगरपालिकेचे अधिकारी यांची भेट घेऊन कामा बाबत बोलायचे व ठेकेदारास ही काम चालु करण्यास सांगायचे परंतु त्यास काहीच प्रतिसाद भेटत नाही हे लक्षात आल्यावर ७ एप्रिल रोजी नगरपालिकेला पुन्हा निवेदन देऊन प्रशासनास सांगितले की बैलबाजार रस्त्याचे काम त्वरित चालु करावे जर १ मे पर्यंत बैलबाजार रस्त्याचे काम चालु झाले नाही तर नगरपालिके समोर धरणे आंदोलन करण्याचा करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांनी दिला होता. 
या वेळेस मात्र नगरपालिका प्रशासनाकडून नवाज कुरेशी यांच्या पाठपुराव्याची दखल घेत आज रोजी बैलबाजार रस्त्याचे काम चालु केले आहे. बैलबाजार रस्त्याचे काम चालु झाल्यावर या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सदर रस्त्याच्या कामामुळे नागरिकांची मोठी अडचण दूर होणार आहे.

COMMENTS