Homeताज्या बातम्याबीड

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची बैठक संपन्न

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत प्राप्त प्रकरणांच्या अनुषंगाने आढावा बैठक  जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेख

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रांजण ठेवले पण पाणीच नाही !पुष्पहार घालून, श्रीफळ फोडून गांधीगिरीतून प्रशासनाचा निषेध-डॉ.गणेश ढवळे
आ. विजयसिंह पंडित यांच्या पाठपुराव्याला यश-गोदावरी नदीपात्रात पाणी सुटणार
वृक्ष लागवडीसाठी जमिनीच्या उपलब्धतेचे काटेकोर नियोजन करावे-जिल्हाधिकारी विवेक जॉन्सनबीड जिल्ह्यात 29.50 लक्ष रोपे तयार‘एक शाळा, एक विद्यार्थी, एक झाड’ उपक्रम300 कोटी वृक्षारोपणासाठी प्रशासनाची जय्यत तयारी
Rajiv Gandhi Student Accident Relief Grant Scheme meeting, instructions  given to officers and employees

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत प्राप्त प्रकरणांच्या अनुषंगाने आढावा बैठक  जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे संपन्न झाली.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान , पोलीस अधीक्षक,  जिल्हा शल्यचिकित्सक तसेच शिक्षणाधिकारी, सदस्य उपस्थित होते. बैठकीमध्ये जिल्ह्यातील विविध शाळांमधून प्राप्त विद्यार्थी अपघात प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी एकूण 5 प्रस्ताव समितीपुढे शिफारशीसाठी ठेवण्यात आले होते.त्यापैकी 03 विद्यार्थी अपघाताने मृत्यू  व 02 विद्यार्थी अपघाताने जखमी झालेले होते. सदर प्रस्तावांची छाननी करून समितीमार्फत त्यांना मंजुरी देण्यात आली. पात्र विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना शासन नियमानुसार सानुग्रह अनुदान तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही गतीने पूर्ण करावी, अशा सूचना मा. जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शाळास्तरावर जनजागृती करण्यावर भर देण्यात यावा, असेही निर्देश देण्यात आले. अपघात घडल्यानंतर संबंधित शाळांनी एका महिन्याच्या आत विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करावेत. विहित कालावधीत प्रस्ताव सादर न केल्यास संबंधित शाळांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे  निर्देशही यावेळी देण्यात आले.

COMMENTS