अकोला: भिमाच्या रथाचे सारथी आणि स्वार्थी हे विनोद पंजाबराव सदावर्ते लिखित पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन अकोला येथे आबासाहेब खेडकर सभागृहात प्रमुख मान्

अकोला: भिमाच्या रथाचे सारथी आणि स्वार्थी हे विनोद पंजाबराव सदावर्ते लिखित पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन अकोला येथे आबासाहेब खेडकर सभागृहात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रकाशीत करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याला देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे, अमरावती मतदार संघाचे खासदार मा. बळवंत वानखेडे, पदवीधर मतदारसंघाचे आमदार मा. धीरज लिंगाडे, प्रसिध्द उद्योगपती संतोष हुसे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात हा प्रकाशन सोहळा पार पडला. भिमाच्या रथाचे सारथी व स्वार्थी हे विनोद पंजाबराव सदावर्ते लिखित पुस्तक हे केवळ पुस्तक नसुन आंबेडकरवादी चळवळीचे विचार मंथन करणारे समाजाचा आरसाच आहे. प्रकाशनपुर्वच या पुस्तकाची चर्चा महाराष्ट्र भरात होत आहे. प्रकाशन होताच या पुस्तकाची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे पुस्तक चळवळच्या नावाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा वापर करून स्वतः चा फायदा करून घेणाऱ्या लोकांची चिरफाड केलेली आहे. चळवळीचे सारथी व चळवळीच्या नावावर स्वार्थी कसे होत आहेत याचे विवेचन यामध्ये दिलेले आहे. समाजात परिवर्तन होऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित समाजव्यवस्था निर्माण व्हावी याच उद्देशाने लेखन विनोद पंजाबराव सदावर्ते हे पुस्तक लिहल्याचे अनेक तज्ञ लोकांचे मते आहेत.

COMMENTS