तुझ्या घमेंडीला ब्लाॅक केलंय……!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

तुझ्या घमेंडीला ब्लाॅक केलंय……!

माने ना माने पण किरण माने ची वैचारिक दहशत भक्तांना ना मानवे, हे आता अधोरेखित झाले. आख्खी आयटी सेल उभी करून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो गळा घोटला जात

मुख्यमंत्र्यांनी तात्काळ नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ?
महसूलमंत्री थोरात म्हणाले… सामान्य जनता काँग्रेसशी निष्ठावान व प्रामाणीक

माने ना माने पण किरण माने ची वैचारिक दहशत भक्तांना ना मानवे, हे आता अधोरेखित झाले. आख्खी आयटी सेल उभी करून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो गळा घोटला जातोय, त्याचे एक प्रातिनिधिक स्वरूप किरण माने यांच्या बाबत समोर आले आहे. मुलगी झाली हो, या मालिकेतील भूमिकेमुळे महाराष्ट्रात घराघरात पोहोचलेले किरण माने यांची सोशल मिडियावरिल एखादी काव्यमय पोस्ट सत्ताधारी वर्गाला घाम फोडेल, असं कधी कुणी स्वप्नातही पाहिलं नसेल. पण् म्हणतात ना, कल्पनेपेक्षा वास्तव विखारी असू शकते. अगदी तसाच प्रकार किरण माने या अभिनेत्याला मालिकेतून काढून टाकताना झालाय! स्वतःच्या टाइमलाईनवर पोस्ट करताना किरण माने यांच्या दोनच कडव्यांनी सत्तावर्ग घायाळ झाला. काय होते ते शब्द? किरण माने यांच्याच शब्दांचे पुनरूच्चार इथे करतोय


..व्हय..कबूल..राजा तुमच्यातला हाय.पण सोन्या,

‘ राज्य संविधानाचं हाय, हे इसरायचं नाय.

तुझा जातीभेद, तुझा धर्मभेद,तुझा मनभेद,

तुझा बुद्धीभेद,सगळे भेद आणि वेद घरी ठेव बावळ्या..

तुला शिवरायांच्या मावळ्यानं ब्लाॅक केलंय
ते आंदोलनजिवी, हे अतिरेकी..,ते देशद्रोही..,

हे फुरोगामी,तुझ्या अनौरस बापाचे तळवे चाटणाराच इमानी,

मनमानी कारभाराला बुच बसवणारा खलिस्तानी…इसरू नगसं,

अर्ध्या रस्त्यातनं भेदरून उलटं पळायला लावलय,धुंदीला ब्लाॅक केलंय….
अभिनेता हा सामाजिक भूमिका घेतोय. त्यांच्या या शब्दात कोठेंही राजकीय भूमिका येत नाही. परंतु, अभिनेता हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्या शब्दांतून मांडतोय. सत्तेच वास्तव भान काय आहे हे आपल्या ग्रामीण लहेजा मध्ये स्पष्ट मांडणारे माने यांना एका टीव्ही सिरीयल मधून डच्चू दिला जातो याचा अर्थ काय? सत्ता आणि सत्ताधारी यांना एका व्यक्तीचे शब्द जिव्हारी का लागले? अर्थात, या प्रश्नाला काहींचे उत्तर असेही असू शकेल की, सत्ताधाऱ्यांनी कुठे त्यांना मालिकेतून डच्चू दिलाय? पण, आज भारतीय समाज इतका दूधखुळा राहिला नाही, की त्याला या सर्व घटनाक्रमाचा अर्थ उलगडू नये. खर तर देशात सध्या असं वातावरण झालंय की, ‘ हम आह भी करते है तो हो जाते हैं बदनाम, वह कत्ल मी करे तो चर्चा नही होता’, काहीसा असाच प्रकार सुरू आहे. स्टॅंड‌अप काॅमेडियन असो वा एखाद्या काॅमेडी शो चा जज् कोणालाच अभिव्यक्तिची मुभा नाही. परंतु, हे कळत असणारे सर्वच यांवर व्यक्त होतातच असे नाही. माने व्यक्त झाले. ते सत्ता कशावर आधारलेली आहे हे, सांगतानाच शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आंदोलनजिवी, खलिस्तानी असे म्हणणाऱ्यांना थेट कोट केलंय. बहुधा, सिलिकॉन व्हॅलीतूंन परतलेल्यांना  विनाश्रम मिळणाऱ्या बक्कळ मोबदल्यात काहीतरी चाटूगिरी करावीच लागेल. त्याचा अविभाज्य परिणाम गेली सत्तर वर्षे लोकशाहीत अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य उपभोगणारा समाज एकाएकी व्यक्त होण्यापासून वंचित ठेवला जाऊ लागला. त्यासाठी देशद्रोही आणि काय ठरविण्याचे फंडे वापरले जातात हे देखील माने स्पष्ट शब्दात मांडतात. ते म्हणतात…तुझ्या मस्तीला, तुझ्या गुर्मिला ब्लाॅक केलंय,
आमच्या विरोधात कोण बोलणारंय?बोलला तर असं सोडणारंय?बदनाम करू….शिव्या देऊ..अडकवू…. जगणं मुश्किल करू…या घमेंडीला ब्लाॅक केलंय…..
इतक्या स्पष्ट शब्दात व्यक्त होणे यापूर्वी म्हणजे आणिबाणी च्या काळात देखील व्यक्त होता आले होते. पण आज अशा प्रकारे व्यक्त होणाऱ्याला काय काय केलं जातं, याची स्पष्टता असतानाही व्यक्त होणं हीच लोकशाहीतील कणखरता आहे. ही कणखरता माने या अभिनेत्याने पूर्णपणे दाखवली. त्यामुळे, त्यांच्या या अभिव्यक्त होण्याच्या अधिकारांच आम्ही समर्थन करतो. कदाचित, त्यांच्या आणि आमच्या विचारात सहमती नसेल, समान विचार नसतीलही परंतु, याचा अर्थ असा नव्हे की, त्यांना व्यक्त होण्यापासून रोखणे इष्ट ठरेल. लोकशाही जिवंत राहीली आणिबाणी नंतर, ते अशा लढवय्या घटकांकडूनच! आजच्या स्थितीत देखील आम्हाला या घटकांना बळ द्यावे लागेल! 

COMMENTS