पावसामुळे पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत.

Homeताज्या बातम्या

पावसामुळे पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत.

प्रशासनाच्या सतर्कतेमुळे दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही

अमरावती प्रतिनिधी- राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी नाले हे तुडुंब भरून वाहत आहे. यादरम्यान अमरावती(Amravati) मध्ये एक थरकाप उडवणार

‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’चा दणका : नांदेड ग्रामीण पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; पाच जण रंगेहात ताब्यात
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची हत्या
गर्लफ्रेंडचा खर्च भागवण्यासाठी बॉयफ्रेंड बनला गुंड ! फसवणुकीचं नाट्य उघड

अमरावती प्रतिनिधी- राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी नाले हे तुडुंब भरून वाहत आहे. यादरम्यान अमरावती(Amravati) मध्ये एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे.त्याचा व्हिडिओ सोशल मीडियाला जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये अमरावतीमधील एक दुमजली इमारत जमीनदोस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. अमरावती शहरातील गांधी चौक-राजापेठ रोडवर(On Gandhi Chowk-Rajapeth Road) असलेली एक दुमजली इमारत कोसळली. काल रात्रीच इमारतीचा काही भाग कोसळला होता. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून सर्व इमारत रिकामी केली होती. त्यामुळे प्रशासनाच्या सतर्कतेमुळे सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

COMMENTS