परभणी : वीज कोसळून दोघांचा मृत्यू

Homeशहरंपरभणी

परभणी : वीज कोसळून दोघांचा मृत्यू

परभणी,- प्रतिनिधी तालुक्यातील साटला शिवारात मंगळवारी (दि.05) दुपारी 4.30 च्या सुमारास वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला. एक व्यक्ती गंभीर जखमी झाली.

प्रेयसीच्या शरीराचे 50 तुकडे करून फेकले जंगलात
विरभद्र मंदिर ट्रस्टची मानाची होळी; नगराध्यक्षांना निमंत्रण नाही
पवार साहेब, एस. टी. संघटनेचे बगलबच्चे आपलेच ! | LOKNews24

परभणी,- प्रतिनिधी

तालुक्यातील साटला शिवारात मंगळवारी (दि.05) दुपारी 4.30 च्या सुमारास वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला. एक व्यक्ती गंभीर जखमी झाली.

साटला शिवारात 4.30 च्या सुमारास वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला. त्याचवेळी वीज कोसळली. त्यात बालासाहेब काकडे, ऋषीकेश काकडे व हरिभाऊ काकडे या तीघा शेतकर्‍यांच्या अंगावर वीज कोसळली.

त्यात बालासाहेब काकडे व ऋषीकेश काकडे या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली. हरिभाऊ काकडे यांना परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकाराने गावात शोककळा पसरली आहे.

COMMENTS