Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गेवराईच्या सांस्कृतिक परंपरेला आर्ट ऑफ फन अकॅडमीने नवसंजीवनी दिली- गीताभाभी बाळराजे दादा पवार; आर्ट ऑफ फन अकॅडमीचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

बीड : गेवराईच्या सांस्कृतिक चळवळीला नवे बळ देणार्‍या आर्ट ऑफ फन अकॅडमी कौतुकास पात्र ठरत आहे. आर्ट फन अकॅडमीची विद्यार्थ्यांनी केवळ गेव

सरकारच्या संवेदनाहीन धोरणाच्या निषेधार्थ धनगर समाज रस्त्यावर; लिंबागणेश येथे रास्ता रोको
बीड जिल्हा बामुक्टा संघटनेच्या उपाध्यक्षपदी डॉ. विलास भिलारे यांची बिनविरोध निवड
ट्रान्सजेंडर विधेयकाविरोधात बीडमध्ये विविध संघटनांचा निषेध; जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

बीड : गेवराईच्या सांस्कृतिक चळवळीला नवे बळ देणार्‍या आर्ट ऑफ फन अकॅडमी कौतुकास पात्र ठरत आहे. आर्ट फन अकॅडमीची विद्यार्थ्यांनी केवळ गेवराईच नव्हे तर बीड, नाशिक पुणे आणि मुंबई येथे आपला कलाविष्कार सादर करून घवघवीत यश मिळवले आहे. गेवराईमध्ये नव कलाकरांची पिढी घडवण्याचा वसा हाती घेऊन आर्ट ऑफ फन अकॅडमीने गेवराईच्या सांस्कृतिक परंपरेला नवसंजीवनी दिली आहे असे मत गेवराई नगर पालिका अध्यक्षा सौ गीताभाभी बाळराजे दादा पवार यांनी व्यक्त केले.
सन 2025-26 या वर्षातील नृत्य व नाट्य विभागाचा बक्षीस वितरण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन गेवराईच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा आदरणीय सौ. गीताभाभी बाळराजे दादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या पाच वर्षांपासून गेवराईच्या थंडावलेल्या सांस्कृतिक परंपरेला नवसंजीवनी देत अकॅडमीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार श्री. सुभाष सुतार यांच्या हस्तेही विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या वेळी बोलताना नगराध्यक्षा सौ. पवार यांनी सांगितले की, कलेला वय नसते, त्यामुळे आर्ट ऑफ फन अकॅडमीच्या प्रत्येक उपक्रमात पवार परिवार सदैव पाठीशी राहील. तर ज्येष्ठ पत्रकार श्री. सुतार यांनी कला मानवाला समृद्ध करते आणि अकॅडमीचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे मत व्यक्त केले. पालक प्रतिनिधी मुस्कान वादवाणी मॅडम यांनीही अकॅडमीमुळे मुलांमध्ये सकारात्मक बदल झाल्याचे सांगितले. या सोहळ्यात चौथे विश्व मराठी संमेलन (नाशिक), अतुल परचुरे बाल कला करंडक (पुणे), राज्य बालनाट्य स्पर्धा (बीड), जल्लोष लोककलेचा (मुंबई), इतिहास महाराष्ट्राचा (मुंबई) आणि रंगोत्सव (गेवराई) या विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.  ज्ञानदा जोशी, अथश्री देशपांडे, आद्या बोर्डे, आर्या वावरे, मन्नत वादवाणी, प्रांजल टाक, पल्लवी उघडे, काव्या मुंदडा, अन्वी मुंदडा, अवनी खेत्रे, केतकी कवडे, कृष्ण्ली कवडे, स्वरा झेंडेकर, विदिशा जाधव, ऋताक्षी मगर, तन्मयी घाडगे, आरोही वाघमारे, वेदांत दहिवाळ, श्लोक मानधने, वेदांत कोकाटे, श्लोक गायकवाड, अजित सदाफुले, आयुष कांडेकर आणि सिद्धांत निकम या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाने अकॅडमीचे नाव उंचावले. कार्यक्रमाला ज्येष्ठ कलावंत तथा बालरंगभूमी परिषदेचे जिल्हा समन्वयक शाहीर विलास बापू सोनवणे, इको इम्पॅक्ट फाउंडेशनचे संस्थापक रोहन पंडित, पालक प्रतिनिधी निकम मॅडम तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मनिषा मानधने, प्रस्तावना रोहित पुराणिक यांनी मांडली, तर आभार प्रदर्शन राम जोशी सर यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अकॅडमीचे संचालक शिवकुमार सोनवणे, रोहित पुराणिक व विवेक शर्मा यांनी विशेष परिश्रम घेतले. या भव्य सोहळ्यामुळे गेवराईच्या सांस्कृतिक क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नवा रंगमंच मिळाला आहे.

COMMENTS