केंद्र सरकारने तरी महाराष्ट्राला किती मदत करायची..? पंकजा मुंडेंचा सवाल

Homeमहाराष्ट्र

केंद्र सरकारने तरी महाराष्ट्राला किती मदत करायची..? पंकजा मुंडेंचा सवाल

प्रतिनिधी : बीड मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून नेला आहे. शेतींचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. आता शेतकऱ

राज्याच्या मंत्रिपदी नियुक्तीनंतर पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचं औक्षण केलं.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरास भेट
पॉश कायद्याचे पालन न केल्यास कारवाई : आयुक्त मिनियार

प्रतिनिधी : बीड

मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून नेला आहे. शेतींचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. आता शेतकऱ्यांकडे काहीही शिल्लक राहिलेले नाही. 

या नुकसानीचे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, जलयुक्त शिवार योजनेतील सगळीच कामे चुकीची झाली असतील असे नाही. 

त्यातील काही कामे चुकीची झाली असेल. जलयुक्त योजना ही लोकउपयोगी आणि सकारात्मक योजना होती. मराठवाडा विदर्भातील जलयुक्त योजनेत निर्माण करण्यात आलेल्या पात्राच्या बाहेर पाणी आलं आहे. 

काही ठिकाणी पाणी स्वतःचे पात्र सोडून तीन किलोमीटरपर्यंत पसरलं असल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

जलयुक्त योजनेत पाण्याचा मुख्य प्रवाह बदलला असल्यामुळे मराठवाड्यात पुरस्थिती निर्माण झाली होती. यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, जलयुक्त योजनेत नैसर्गिक प्रवाह बदलण्याची कुठलीही तरतूद नव्हती, ते नियमात बसत नाही. 

ज्या नद्या आहेत त्याचे खोलीकरण करणे, बंधारा बांधण्याची तरतूद करण्यात आली आहे. पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याची कोणत्याही योजनेत परवानगी देण्यात आली नाही, असेही असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

आजच्या घडीला राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहिले पाहिजे. केंद्र सरकारने किती मदत करायची? महाराष्ट्राची जनता अनाथ झाली का काय? 

त्यांचे कोणीच वाली नाही का? प्रत्येक जण एकमेकांवर एकमेकांकडे बोट दाखवण्याचे काम करत आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करुन मुख्य मुद्द्याला बगल देणे सरकारचे काम नाही. 

सध्याची परिस्थिती गंभीर आहे, गावागावात पाणी शिरले आहे. शेत वाहून गेलं आहे. जमीनी खराब झाल्या आहेत. पीकाचे नुकसान, शेतजमीन दुरुस्त करण्यासाठी मदत, गावांचे नुकसान झालं आहे. 

रस्ते, पाठबंधाऱ्यांची कामे करण्याचे काम राज्य सरकारला करायचे आहे. यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी,अशी मागणी पंकजा मुंडेंनी केली.

COMMENTS