Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जोहरापूर पुलावर दोन दुचाकींचा अपघात ; तरुणाचा मृत्यू

शेवगाव : शेवगाव- नेवासा मार्गावर शेवगावपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या जोहरापूर येथील ढोरा नदीच्या पुलावर शनिवारी (दि. १४) सायंकाळी दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक होऊन एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला.  मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव शोयब निजामुद्दीन पटेल (वय ३२, रा. खामगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) असे आहे. ते आपले दुकान बंद करून खामगावकडे जात असताना समोरून येणाऱ्या प्लेटिना मोटरसायकलने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात शोयब पटेल यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. प्लेटिना दुचाकी ही शेवगावच्या दिशेने जात होती. संबंधित वाहनचालक मजलेशर येथील असल्याचे समजते. या दुर्घटनेमुळे जोहरापूर व खामगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  दरम्यान, शेवगाव तालुक्यात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असताना लोकप्रतिनिधी मात्र केवळ पाहत बसण्याची भुमिका घेतल्याने नारिकांची भावना आहे. इंग्रजकालीन अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा होत असून, तातडीने रस्त्यांची सुधारणा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; २ तरुणांचा जागीच मृत्यू
मद्यधुंद चालकाचे ट्रक वरचे नियंत्रण सुटल्याने ट्रकचा आपघात 
अंत्यविधीसाठी निघाले वाटेत मृत्यूने गाठले.

शेवगाव : शेवगाव- नेवासा मार्गावर शेवगावपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या जोहरापूर येथील ढोरा नदीच्या पुलावर शनिवारी (दि. १४) सायंकाळी दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक होऊन एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

 मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव शोयब निजामुद्दीन पटेल (वय ३२, रा. खामगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) असे आहे. ते आपले दुकान बंद करून खामगावकडे जात असताना समोरून येणाऱ्या प्लेटिना मोटरसायकलने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात शोयब पटेल यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. प्लेटिना दुचाकी ही शेवगावच्या दिशेने जात होती. संबंधित वाहनचालक मजलेशर येथील असल्याचे समजते. या दुर्घटनेमुळे जोहरापूर व खामगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 दरम्यान, शेवगाव तालुक्यात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असताना लोकप्रतिनिधी मात्र केवळ पाहत बसण्याची भुमिका घेतल्याने नारिकांची भावना आहे. इंग्रजकालीन अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा होत असून, तातडीने रस्त्यांची सुधारणा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

COMMENTS