Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोलापूर आणि पंढरपूर रेल्वे स्थानकावर जागतिक हेरिटेज दिन साजरा

सोलापूर ः जगभरात 18 एप्रिल रोजी जागतिक हेरिटेज दिन म्हणून साजरा केला जातो.  त्यात अनुषंगाने सोलापूर रेल्वे विभागाने हा उत्सव आपल्या जवळ असलेल्या

हिंगोली जिल्ह्यातील धान्य घोटाळा प्रकरणीतहसीलदार गजानन शिंदे आरोपीच्या पिंजर्‍यात
हिमायतनगरात तहेजीब फाउंडेशनच्यावतीने एकोणीस जोडपे विवाहबद्ध…
‘आनंदाचा शिधा’ चा 17 हजार कुटुंबीयांना मिळणार लाभ

सोलापूर ः जगभरात 18 एप्रिल रोजी जागतिक हेरिटेज दिन म्हणून साजरा केला जातो.  त्यात अनुषंगाने सोलापूर रेल्वे विभागाने हा उत्सव आपल्या जवळ असलेल्या दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन  ठेवून साजरा केला. विभागीय रेल्वे व्यस्थापक नीरज कुमार दोहारे आणि डॉ. मेतन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात पूर्वीचे पंचिंग करून वितरित करण्यात येणारे तिकीट, त्यासाठीची पंचिंग मशीन, विविध प्रकारचे दिवे, इंजिनला लागणारे सामान, फोटो इत्यादी वस्तू प्रदर्शनात ठेवण्यात आल्या.
सोलापूर व पंढरपूर येथे असलेल्या छोट्या गाडीचे (नॅरो गेज) इंजिन व डब्यांना सजवण्यात आले. डॉ. मेतन फाउंडेशनचे अध्यक्ष मेतन यांनी जागतिक वारसा दिवस का साजरा करावा याविषयी संभाषण दिले व त्यांच्याकडे असलेले व पाहिलेले हेरिटेज वस्तूंचा खजाना एका डॉक्युमेंटरी मार्फत दाखवण्यात आला.  याचे जतन करण्याचे व भेट देण्याचे आवाहन त्यांनी प्रत्येकाला केले. नीरज कुमार दोहरे यांनी यांनी आपले मत व्यक्त करताना सोलापूर विभागातील हेरिटेज वस्तू जपणार्‍या सर्वांचे कौतुक केले व ते असेच जपून राहावे अशी इच्छा व्यक्त करत याची सर्वांना माहिती व्हावी यासाठी प्रयत्न करण्यासाठी सांगण्यात आले. त्याचबरोबर पंढरपूर रेल्वे स्टेशन येथे शुद्धा वर्ल्ड हेरिटेज डे साजरा करण्यात आला. याप्रसंगी अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री शैलेंद्र सिंह परिहार आणि वरिष्ठ विभागीय संरक्षा अधिकारी श्री शिवाजी कदम, यांच्या  उपस्थितीत  पार पडला. संजय उत्सर्गे यांनी जागतिक वारसा दिनानिमित्त एक माहितीपट सादर केला. कृष्णा सुरवसे यांनी रेल्वे कडे असलेल्या हेरिटेज वस्तूंची डॉक्युमेंटरी द्वारे सर्वांना माहिती दिली. वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता रामलाल प्यासे व इ.एन.एच.एम.चे प्रभारी उपस्थितांचे स्वागत केले आणि सोलापूर विभाग पुढील काळात अनेक वस्तू एकत्रित करून सोलापूर मध्ये हेरिटेज गॅलरी चालू करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा उल्लेख केला. याप्रसंगी वरिष्ठ विभागीय अभियंता (समन्वय) चंद्रभूषण, वरिष्ठ विभागीय वित्त व्यस्थापक विवेक होके, वरिष्ठ विभागीय अभियंता जगदीश, वरिष्ठ विभागीय भंडार (सामग्री) व्यवस्थापक रामचरण मीना मुख्य वैद्यकीय अधीक्षक राजेंद्र माने, सहायक वाणिज्य व्यस्थापक श्रीमती कल्पना बनसोडे, सहायक विभागीय यांत्रिकी अभियंता दिलीप तायडे इत्यादी अधिकारी आणि एच. एम नाटेकर सहा.मं.यांत्रिक इंजिनिअर व सी. सेक्शन इंजिनिअर जितेंद्र वाघमारे, सी एण्ड डब्ल्यू, आणि रेल्वे कर्मचारी यांनी आपली उपस्थिती नोंदवली.

COMMENTS