Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांद्रे येथे माजी सैनिकाचा विळ्याने गळा चिरून खून

सांगली / प्रतिनिधी : रविवारी रात्री नांद्रे (ता. मिरज) येथे आप्पासाहेब बाळकृष्ण कुरणे (वय 75) या माजी सैनिकाचा विळ्याने गळा चिरून निर्घृण खून करण

पावसाने उघडीप दिल्याने दिवाळीनिमित्त पालकमंत्र्यांचे शेतकर्‍यांच्या बांधावर दौरे
माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कराड पालिकेच्या अधिकारी-कर्मचार्‍यांचा सत्कार
कवठेएकंदजवळ विटा-सांगली बसवर दगडफेक; चालक जखमी

सांगली / प्रतिनिधी : रविवारी रात्री नांद्रे (ता. मिरज) येथे आप्पासाहेब बाळकृष्ण कुरणे (वय 75) या माजी सैनिकाचा विळ्याने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला. ग्रामीण पोलिसांच्या पथकाने या प्रकरणी सूरज रामचंद्र कुरणे (वय 29), संजय भूपाल बनसोडे (वय 42, दोघेही रा. नांद्रे) या दोघा संशयितांना अटक केली आहे. याबाबत आप्पासाहेब यांचा मुलगा बाळू कुरणे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. संशयित दोघांना न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बाळू याचे आजोळ तुंग आहे. तो त्या ठिकाणी राहतो. अप्पासाहेब हे कधी तुंग येथे तर कधी नांद्रे येथे राहत होते. संशयित सूरज कुरणे हा त्यांचा चुलत चुलत भाऊ लागतो. संजय बनसोडे हा सूरज याच्या ओळखीचा आहे. कुरणे निवृत्ती वेतन जमा झाल्यानंतर संशयित दोघांना दारू देत होते. रविवारी रात्री तिघे दारू पीत बसले होते. त्यावेळी दारूच्या पैशांवरून कुरणे यांच्याशी दोघांनी वाद घालण्यास सुरूवात केली. वाद टोकाला गेल्यानंतर दोन संशयितांनी मद्यधुंद अवस्थेत अप्पासाहेब यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
एकाने काठीने डोक्यात मारहाण केली. त्यावेळी कुरणे जमिनीवर पडले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कुरणे यांना पाहून संशयितांनी विळ्याने गळ्यावर वर्मी वार केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले कुरणे यांच्या अंगवर पांघरूण टाकून दोघेही संशयित पळून गेले.
दरम्यान ही माहिती मिळाल्यानंतर अप्पासाहेब कुरणे यांचे नातेवाईक घटनास्थळी गेले. त्यावेळी आप्पासाहेब मृतावस्थेत दिसून आले. तत्काळ ग्रामीण पोलिसांना कळविण्यात आले. पोलीस उपअधीक्षक अजित टिके, निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्यासह पथक घटनास्थळी गेले. दोन संशयितांना रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. दोघांनाही खुनाची कबुली दिली आहे. सुरज कुरणे याच्याविरोधात भिलवडी पोलीस ठाण्यात या पूर्वीचा मारामारीचा एक गुन्हा दाखल आहे.

COMMENTS