Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये महिलांची फ्री स्टाईल हाणामारी

मुंबई प्रतिनिधी - मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या गर्दीमुळे लोकल ट्रेनमध्ये जागा आणि धक्का लागण्यावरू

कोपरगाव बाजार समितीची 350 कोटींवर उलाढाल
पाणी हक्क संघर्ष समितीचा रास्ता रोको
कंगणा राणावतचा जामीन मंजूर

मुंबई प्रतिनिधी – मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या गर्दीमुळे लोकल ट्रेनमध्ये जागा आणि धक्का लागण्यावरून प्रवाशांचे भांडणे आणि हाणामारीच्या घटना वाढू लागल्या आहेत. अशीच एक हाणामारीची घटना लोकल ट्रेनच्या लेडिज डब्यात घडली आहे. महिला प्रवाशांनी एकमेकींच्या झिंज्या उपटून हाणामारी केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये पुन्हा एकदा प्रवाशांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. महिला प्रवाशांच्या झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला आहे. या महिला प्रवासी सुरुवातीला एकमेकांशी भांडताना दिसत आहे.

लोकल ट्रेनच्या डब्यात जोरदार भांडण केल्यानंतर दोन्ही महिला हाणामारी करायला सुरुवात करतात. एक प्रवासी महिला दुसऱ्या महिलेला हाताने मारते. त्यानंतर दोन्ही महिला प्रवासी एकमेकींच्या केस ओढून हाणामारी करायला सुरुवात करतात. त्यानंतर आजूबाजूचे महिला प्रवासी यांचं भांडण सोडवतात. या दोन्ही प्रवासी महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे . दरम्यान, लोकल ट्रेनमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ कोणत्या रेल्वे मार्गावरील आहे, याबाबत सविस्तर माहिती समोर आलेली नाही. मुंबई मॅटर्स या ‘एक्स’ अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत २६ हजारांहून अधिक जणांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे की, ‘मुंबई लोकल ट्रेनच्या लेडिज डब्ब्यावर लवकरच एक वेब सीरीज पाहायला मिळेल. एक क्षणासाठी मला वाटलं की, एखादी कुस्तीचा सामना पाहत आहोत’.

COMMENTS