Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हसवड शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत

म्हसवड / वार्ताहर : म्हसवड शहरात पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरीकात संतांप शहराला 12 दिवसानंतर पाणी पुरवठा होत असल्याने नागरीकांना पाण्या

कोणेगावच्या गिर्यारोहकाने केला नानाचा अंगठा सर
खा. उदयनराजे भोसले यांच्याकडून वाईच्या गणपती घाटावर स्वच्छता मोहीम
कृष्णा अभिमत विद्यापीठाचा ‘सी-मेट’शी सामंजस्य करार; बायोमेडिकल संशोधनाला मिळणार चालना

म्हसवड / वार्ताहर : म्हसवड शहरात पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरीकात संतांप शहराला 12 दिवसानंतर पाणी पुरवठा होत असल्याने नागरीकांना पाण्याचे टँकर विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. म्हसवड शहराला पाणी पुरवठा तातडीने न केल्यास तिव्र आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी नगरसेवक शांताराम माने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी शहराला दररोज सुरळीत पाणी पुरवठा करावा, अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे.
म्हसवड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी 79 कोटी पिण्याची पाणी पुरवठा योजना मंजूर असून या पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्ण आहे. तसेच म्हसवड येथील शेंबडे वस्तीवरुन शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी 15 कोटी रुपयाची आपतकालीन योजना सुरु केली होती. मात्र, तांत्रीक कारणामुळे व दुष्काळ पडल्यामुळे या योजनेचे पाणी पुरवठा बंद अवस्थेत आहे. त्यामुळे शहरातील नागरीकांना पाणी पुरवठा समस्याला सामोरे जावे लागत आहे. सध्या शहरात 700 रुपये प्रती टँकर याप्रमाणे पाणी विक्री खाजगी पुवठा दाराकडून करण्यात येत आहे. यामुळे गोरगरीब जनतेला पाणी विकत घेणे शक्य नसल्यामुळे प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे. म्हसवड नपाने याबाबत कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहर व परिसरातील विहीरी कोरड्या पडलेल्या आहेत. वाडीवस्तीवर व शहरातील मुख्यभागात टॅकरने पाणी पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.

याबाबत म्हसवड शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी माजी नगराध्यक्ष नितीन दोशी पत्रकार विजय टाकणे, महेश कांबळे यांनी माणचे आ. जयकुमार गोरे यांंना समक्ष भेटून म्हसवड पाणी पुरवठा तातडीने पाणी पुरवठा करण्याबाबत मागणी केली होती. याबाबत मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांना आ. गोरे यांनी सुरळीत पाणी पुरवठा करण्याबाबत सूचना केली आहे. मात्र, मुख्याधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. याबाबत आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS