Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृष्णा अभिमत विद्यापीठाचा ‘सी-मेट’शी सामंजस्य करार; बायोमेडिकल संशोधनाला मिळणार चालना

कराड : सामंजस्य करारप्रसंगी कुलपती डॉ. सुरेश भोसले, डॉ. बी. बी. काळे व मान्यवर. कराड / प्रतिनिधी : येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठान

वाठारला महिलांच्या ग्रामसभेत दारू दुकान-बिअर बारला विरोध
येलूर ग्रामपंचायत बिनविरोध : महाडीक गटाला सरपंच पद
ओमायक्रॉनच्या पार्श्‍वभूमिवर सातारा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज; जिल्हा रुग्णालयात 100 बेडसह दोन आसीयू राखीव : डॉ. सुभाष चव्हाण

कराड / प्रतिनिधी : येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाने केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत असलेल्या सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (सी-मेट) या स्वायत्त वैज्ञानिक संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे बायोमेडिकल संशोधनाला चालना मिळणार आहे.
कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे व ‘सी-मेट’चे महासंचालक डॉ. बी. बी. काळे यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या करारामुळे नॅनोटेक्नॉलॉजी, बायोसेन्सर, बायोइमेजिंग आणि बायोइलेक्ट्रॉनिक्स डोमेनमधील सहयोगी संशोधन, नवोपक्रम, विद्यार्थी प्रशिक्षण आणि उत्पादन विकास उपक्रमांना चालना मिळणार आहे.
यानंतर कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या संशोधन संचालनालयाच्या पुढाकाराने आणि कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसी व कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ अलाईड सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बायोमेडिकल डोमेनमध्ये नॅनोमटेरिअल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स वापरण्याच्या संधी आणि आव्हाने’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी डॉ. बी. बी. काळे यांनी मार्गदर्शन केले. अतिरिक्त संशोधन संचालक डॉ. डी. के. अग्रवाल यांनीही उपस्थितांना संबोधित केले. संशोधन शास्त्रज्ञ डॉ. जयंत पवार यांनी आभार मानले.
याप्रसंगी डॉ. मनिष शिंदे, डॉ. सुधीर अर्बुज, डॉ. हर्षराज जाधव, ऋषिकेश काळे, डॉ. अमोल शेटे, प्रा. स्नेहल मसूरकर, डॉ. अमर मोहिते, डॉ. रोहन फाटक, धीरज माने यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS