Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोल्यात 132 दिव्यांगांनी केले घरातून मतदान

लिंगदेव येथील 102 वर्षांच्या आजीने केले मतदान

अकोले : शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी अकोले तालुक्यातील 132 दिव्यांग व्यक्तींनी तर  लिंगदेव येथील 102 वर्षे वयाच्या भागीरथीबाई लक्ष्मण कानवडे यांनी

’सदगुरू’चा विद्यार्थी कृषी क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेतृत्व करेल : डॉ. शंकरराव नेवसे
Ahmednagar : अवास्तव करवाढी विरोधात विविध संघटनांचे धरणे आंदोलन I LOK News 24
पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत

अकोले : शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी अकोले तालुक्यातील 132 दिव्यांग व्यक्तींनी तर  लिंगदेव येथील 102 वर्षे वयाच्या भागीरथीबाई लक्ष्मण कानवडे यांनी घरात बसून मतदान करत मतदानाचा हक्क बजावला. अकोले तालुक्यातील दिव्यांग व 85 वर्षांपेक्षा जास्त वय असणार्‍या ज्या मतदारांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर येऊन मतदान करणे शक्य नाही, आशा मतदारांचा सर्व्हे करून 141 मतदार यांना घरूनच मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
त्यापैकी 21 दिव्यांग व 111 वृद्ध मतदारांनी घरूनच मतदानाचा हक्क बजावला, यासाठी आठ पथके नियुक्त करण्यात आली होती. 7 व 8 मे रोजी गृहभेटी द्वारे हे मतदान करून घेण्यात आले. अकोले तालुक्यातील 68 महसुली गावांतून या 141 वृद्ध व दिव्यांग मतदारांना ही सुविधा देण्यात आली होती. तथापि त्यातील 5 मतदार मयत झाले आहेत. 4 मतदार त्याच्या घरी उपस्थित नसल्याने त्यांचे मतदान होऊ शकले नाही. उर्वरित 132 वृद्ध व दिव्यांग मतदारांनी या सुविधेचा लाभ घेतल्याचेसहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी माहिती दिली.

COMMENTS