Homeताज्या बातम्या

तामिळमधील प्रसिद्ध विनोदवीर मायिलसामी यांचे निधन

टॉलिवूडमधील अभिनेते आणि नेते नंदामुरी तारक रत्न यांच्या निधनानंतर आणखी एका अभिनेत्याच्या निधनाने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.सा

घटस्थापनेनिमित्त मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक घेतले मुंबादेवीचे दर्शन
काळे कारखान्याकडून ऊसतोडणी कामगारांची केली आरोग्य तपासणी
खासदार निलेश लंकेंनी घेतले कोठला येथे हजरत इमाम हुसेन यांच्या सवारीचे दर्शन

टॉलिवूडमधील अभिनेते आणि नेते नंदामुरी तारक रत्न यांच्या निधनानंतर आणखी एका अभिनेत्याच्या निधनाने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.सालिग्रामम (चेन्नई) येथे अभिनेत्याची अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी त्यांचा आधीच मृत्यु झाल्याचे सांगितले.मायिलसामी यांच्या निधनानंतर अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे तसेच दुःख व्यक्त केले आहे. मायिलसामी सालिग्रामम येथे राहत होते. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना कुटुंबीयांनी चेन्नईतील बोरूर येथील जवळच्या रुग्णालयात नेले. पण त्याआधीच त्यांना मृत्युने कवटाळले होते.

COMMENTS