Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तहसीलदार साहेब, कर्मचार्‍यांना जरा आवर घाला 

कर्जत/प्रतिनिधी :  शासकीय कार्यालयांमध्ये धुम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. मात्र कर्जतच्या तहसील कार्यालयातील कर्मचारी पान, मावा, तंबाखूजन्य पदार्

नगरजवळ होऊ शकते…नवे पुणे शहर…
मराठा सर्वेक्षणाचे अ‍ॅप चालूच होत नसल्याने प्रगणकांना मनस्ताप
रेल्वे स्टेशन भागात पुन्हा पोलिस चौक सुरु करावी

कर्जत/प्रतिनिधी :  शासकीय कार्यालयांमध्ये धुम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. मात्र कर्जतच्या तहसील कार्यालयातील कर्मचारी पान, मावा, तंबाखूजन्य पदार्थ खाऊन इमारतीच्या भिंती लाली लाल करून विद्रूप करत असल्याचे चित्र दिसत आहे. शासकीय नियम व आदेश यांचे सर्रासपणे उल्लंघन करून येथे धुम्रपान,पान, मावा, तंबाखूजन्य पदार्थ  सेवन केले जात आहे. तालुक्याचे पालक असलेल्या तहसीलदार यांच्या कार्यालयाची ही दयनीय अवस्था झाल्याचे पहावयास मिळत आहे. तहसीलदार गणेश जगदाळे यांचे कर्मचार्‍यांवर  कोणतेही नियंत्रण नसल्यानेच या प्रकारात वाढ झाल्याचे दिसत आहे.
धूम्रपान करण्याच्या नावाखाली कर्तव्यावरील अनेक कर्मचारी कित्येक वेळा कार्यालयाबाहेर टपर्‍यांवर जाताना दिसत आहेत. तंबाखूजन्य पदार्थ खाऊन कार्यालयातील खिडक्या, इमारतीतील कोनाडे गाठून त्या जागा रंगीबेरंगी करताना दिसत आहेत. त्यामुळे इमारत व त्या कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरवले जात आहे. त्यातून कामानिमित्त येणार्‍या नागरिकांमध्ये रोगराई पसरण्याचा धोका देखील निर्माण झालेला दिसून येत आहे.नायब तहसीलदार यांचे दालन असलेल्या कार्यालयाच्या भिंती आतूनच रंगवलेल्या दिसत आहेत. कर्मचार्‍यांचा वावर असलेल्या केबिनमधील भिंती धूम्रपानाच्या पिचकार्‍या मारून रंगवलेल्या आहेत. या गंभीर प्रकाराची दखल घेऊन तहसीलदार कर्मचार्‍यांना लेखी समज देणार का ? कार्यालयात धूम्रपान करणार्‍यांवर दंडात्मक व प्रशासकीय कारवाई करणार का ? हा प्रश्‍न आता नागरिकांकडून विचारला जात आहे.
चौकट : इमारतीचें विद्रूपीकरण
कर्जत- जामखेड मतदारसंघाचे आ. रोहित पवार यांनी शासकीय कार्यालयांच्या इमारती सुशोभित करण्यासाठी रंगरंगोटी करण्यावर लाखो रुपयांचा खर्च केला. मात्र त्याची स्वच्छता राखण्याची जबाबदारी अधिकारी व कर्मचार्‍यांकडून पार पाडली जाताना दिसत नाही. त्यामुळे इमारती विद्रूप होतांना दिसत आहेत.

COMMENTS