Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याला सुटणार उन्हाळी आवर्तन

जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी पाट पाण्यासाठी फॉर्म नंबर 7 भरावा

कोपरगाव शहर ः मागील वर्षाच्या अत्यंत कमी पर्जन्यमानामुळे कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांसह पूर्व भागाला मोठ्या प्रमाणात पाण्याची झळा जाणवत असून जर

अण्णा हजारे यांच्या प्रकृतीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून चौकशी
गांधी जयंतीनिमित्त तरडगाव ग्रामस्थांनी घेतली ग्रामस्वच्छतेची शपथ
इंदोरी फाटा बनले अवैध दारू विक्रीचे केंद्र

कोपरगाव शहर ः मागील वर्षाच्या अत्यंत कमी पर्जन्यमानामुळे कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांसह पूर्व भागाला मोठ्या प्रमाणात पाण्याची झळा जाणवत असून जर अशीच परिस्थिती राहिली तर काही दिवसात पिण्याच्या पाण्याचा देखील वनवा मोठ्या प्रमाणात भासु शकते त्यामुळे या सर्वातून मार्ग काढण्यासाठी शेतात उभे असलेल्या शेवटच्या घटका मोजत असलेल्या पिकांना नियमानुसार कॅनॉलचे हक्काचे पाणी मिळावे याकरिता जास्तीत जास्त पात्र शेतकर्‍यांनी पाटबंधारे विभागाकडे रीतसर फॉर्म नंबर 7 भरून आपल्या शेतातील पिकांसाठी पाणी आरक्षित करावे.
कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत असून यामुळे शेवटच्या घटका मोजत असलेली शेतातील बारामाही पिके व जनावरांसाठी असलेल्या चाराचे भवितव्य धोक्यात आले आहे तर नागरिकांसह जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न देखील निर्माण झाला आहे त्यामुळे स्थानिक नेत्यांच्या मागणीनुसार प्रशासनाने पुढील आठवड्यापासून गोदावरी कालव्यांना उन्हाळा हंगामा मधील सन 2023-24 चे आवर्तन सोडण्याचे नियोजन केले असून त्या अनुषंगाने प्रशासनाने शेतकर्‍यांना नजीकच्या सिंचन शाखा कार्यालयात दिनांक 12 मे पर्यंत सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत फॉर्म नंबर 7 भरण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे गोदावरी कालव्याच्या जास्तीत जास्त पात्र शेतकर्‍यांनी आपल्या शेतातील उभी पिके जगण्यासाठी तात्काळ नजीकच्या सिंचन कार्यालयात जाऊन गोदावरी कालव्याचे हक्काचे पाणी मिळावे याकरिता दि 12 मे सायंकाळी सहा 6.15 वाजेपर्यंत फॉर्म नंबर 7 म्हणजेच हक्काचा पाणी मागणी अर्ज रीतसर कागदपत्रे व फॉर्म फी भरून आपले पाणी आरक्षित करावे जर या कॅनॉल च्या पाण्यामुळे आपल्या शेतातील पिकांना पाणी मिळाले तर आपल्या शेतातील जलस्रोतांची पाणी पातळी वाढून पाऊस येईपर्यंत आपला व जनावरांचा पिण्याचा प्रश्‍न काहीसा दूर होऊ शकेल? अन्यथा उद्याची परिस्थिती अत्यंत बिकट होऊ शकते? त्यामुळे जास्तीत जास्त पात्र शेतकर्‍यांनी फॉर्म नंबर 7 पाणी मागणी अर्ज भरावा.

COMMENTS