कुटुंब नियोजन आणि धर्माचे प्रयोजन

Homeताज्या बातम्यासंपादकीय

कुटुंब नियोजन आणि धर्माचे प्रयोजन

लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सध्या कुटुंब नियोजनाशी संबंधित बाबी लो

आता हमीभावासाठी शेतकर्‍यांचा लढा
मंदीचे सावट गडद
अर्थाशिवाय संकल्प

लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सध्या कुटुंब नियोजनाशी संबंधित बाबी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आरोग्य विभागातर्फे कुटुंब नियोजन किटसह ‘रबरी लिंगाचे’ वाटप करण्यात येत आहे. राज्यातील आशा कार्यकर्त्यांना ते लोकांसमोर ‘प्रात्यक्षिक’ दाखवून कुटुंब नियोजनाचा संदेश द्या, आणि लोकांना जागरूक करा, असे आरोग्य विभागाकडून सांगितले आहे, हे योग्यच पण हे असे करण्यासाठी आपला समाज तेव्हडा प्रगल्भ आहे का?. आजपर्यंत २५ हजार आशा कर्मचाऱ्यांपर्यंत हे किट पोहचवण्यात आले आहे. पण याला आता विरोध होत आहे. तो होणेही सहाजिकच. आपल्याकडे योजना चांगल्या डिझाईन केल्या जातात पण त्या राबवल्या जात नाहीत. किंबहुना त्यात पैसे कसे खाता येतील अशी देखील तरतूद असते. हे आपल्याला आजपर्यंत राबवलेल्या योजनेवरून लक्षात येते. उदाहरण द्यायचेच झाले तर ते कोन्डोमचे देता येईल. कोन्डोम मध्ये मागे मोठा भ्रष्ट्राचार झाला होता. आता रबरी लिंगात तो होणार नाही हे कशावरून? बरं, तो झालाच तर चौकशी कुणाची आणि कशाची करायची? समजा, रबरी लिंगाची किंवा त्या ‘कुटुंब नियोजन किटची’ खरेदी करण्याचे आणि आशा कार्यकर्त्यांना वाटप करण्याचे चार पाचशे कोटीचे टेंडर काढले आणि ते किट वितरितही केले तरी, त्यातील सामान निकृष्ट दर्जाचे निघाले तर त्यामुळे वापरकर्त्याच्या शारीरिक अवयवावर होणाऱ्या परिणामाची जबाबदारी सरकार घेणार का? किंबहूना त्याची भरपाई सरकार कशी करणार? या
चे उत्तर ना आरोग्य विभागाकडे ना सरकारकडे. मग काय? तर बसायचे बोंबलत एव्हडेच ते. दुसरे असे की, कुटुंब नियोजन करतांना जर या  किटचा वापर करायचा ठरला तर, विवाहित स्त्री आणि पुरुष ( नवरा बायको ) हे असे कृत्रिम प्रयोग समोरासमोर करण्याएवढे प्रगल्भ आहेत का? किंबहुना नैसर्गिक आनंद सोडून ते असा कृत्रिम आनंद घेतीलच याचे संशोधन आरोग्य विभागाने कोणत्या पुराव्यानिशी लावले? म्हणजे ज्यांनी ही योजना डिझाईन केली आणि ज्यांनी या योजनेला मान्यता दिली त्यांनी प्रत्यक्षात याचे प्रात्यक्षिक केले आहे का? केले असेल तर त्यांनी त्यांचा अनुभव जनतेला सांगितला पाहिजे. ते तसे सांगणार नाहीत हे नक्की.
या संदर्भात तज्ज्ञांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण हाती धुपाटण्याशिवाय काहीच लागले नाही. या योजनेमुळे राज्यातील आशा सेविकांमध्ये मात्र सरकार विरुद्ध प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. हा विषय तसा संवेदनशील आणि वैयक्तिक असल्यामुळे त्यावर भाष्य करण्यास सर्वच जण टाळाटाळ करतात. आपल्याकडे प्रथम जेव्हा कॉन्डोम वापरण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले होते तेव्हा सुद्धा असाच मोठा वाद निर्माण झाला होता. पण, एचआयव्ही या रोगाला घाबरून लोकांनी कोंडोमचा वापर करायला सुरुवात केली. कुटुंब नियोजनाच्या आपल्याकडे विविध पद्धती आहेत. त्यामध्ये पुरुषाचा निरोध, स्त्रियांचा निरोध, शील्ड, वीर्यनाशक जेली, तांबी, स्त्री संप्रेरके आदींचा समावेश आहे. पण याबद्दल सुद्धा लोक उदासीन आहेत. कुटुंब नियोजनात दुसरी प्रमुख समस्या आपल्याकडे आहे ती धार्मिक. प्रत्येक धर्माच्या जगण्याच्या चालीरीती, रीती- रिवाज आपल्याकडे वेगवेगळे आहेत. यामध्ये शासन संस्थेपेक्षा धर्मसंस्थेचा प्रभाव आपल्या लोकांवर अधिक आहे. आपल्याकडे लिकांमधें धर्माचं भ्रष्ट आचरण पाहावयाला मिळते. जसे की, मुले ही देवाघरची फुले ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. मुले होण्यासाठी लोक देवाला नवस करतात किंबहुना जेव्हडे मुले होतील तेव्हडे होऊन देणे, अगदी एक्सपायरी होण्यापर्यंत असाही रिवाज आपल्याकडे आहे. आणि त्याला आधार दिला जातो तो, देवाचा आणि धर्माचा. आपल्याकडे सामाजिक विषमता हि जात, धर्म आणि लिंग या तीन घटकावर आधारित आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान मिळत आले आहे. स्त्री हि केवळ उपभोगाची वस्तू आहे अशी पारंपारिक, प्रतिगामी धार्मिक मानसिकता आहे. स्त्रियांना शिक्षण, सत्ता, संपत्तीचे सारे अधिकार नाकारण्यात आले होते. धार्मिक कायद्यांचा आधार घेवून स्त्रियांवर अधिकाधिक बंधने लादली गेली. सतीप्रथा, हुंडाप्रथा, बालविवाह यासारख्या अनेक अन्यायकारक चालीरीती आपल्याकडे होत्या. ब्रिटीशकाळात जोतीबा फुले आणि सावित्रीमाई, राजा राममोहन रोय यासारख्या भारतीय समाजसुधारकांची स्त्रीस्वातंत्र्याची चळवळ आणि ब्रिटीशांचा स्त्री विषयक पाश्चात्य दृष्टीकोन यामुळे ब्रिटीशानी अनेक वाईट चालीरीती बंद करण्यासाठी कठोर कायदे केले. पुढे डॉ. बाबासाहेबांच्या अभ्यासातून आणि चिंतनातून स्त्री खऱ्या अर्थाने स्वातंत्र झाली पण तिच्यावर अद्यापही धर्माचा पगडा आहे. जोपर्यंत धरणाचे आचरण सर्व लोक सोडणार नाहीत तोपर्यंत वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारण्याची मानसिकता लोक ठेवणार नाहीत. त्यामुळे कुटुंब नियोजनातील प्रमुख अडथळा हा धार्मिक असल्यामुळे आपल्या आरोग्य विभागाने प्रथम संतती संदर्भातील धार्मिक भावनेचे प्रभंजन करणे आवश्यक आहे. हे जेव्हा होईल तेव्हा कुटुंब नियोजनासाठी आरोग्य विभागातर्फे कुटुंब नियोजन किटसह ‘रबरी लिंगाचे’ वाटप करण्याचा प्रश्न निकालात निघालेला असेल. 

COMMENTS