Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धुळ्यात गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने अविवाहित तरुणाचा मृत्यू

धुळे : धुळे शहराजवळील एका गावात अविवाहित 18 वर्षीय तरुणीचा गर्भपातासाठी घेतलेल्या औषधांच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली

शेवगावातील दूध डेअरीवरील कारवाईनंतर गोंधळ
न्यायालय लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन देतेय ?
हॉटेलमधील‘बनावट’ पनीर वापरल्यास कारवाई
Girl Dies After Private Coaching Class Sir Gave Her Abortion Pills in  Yavatmal | शिक्षकाने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या; विद्यार्थिनीचा मृत्यू,  यवतमाळमधील धक्कादायक घटना

धुळे : धुळे शहराजवळील एका गावात अविवाहित 18 वर्षीय तरुणीचा गर्भपातासाठी घेतलेल्या औषधांच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मोहाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला देवपूर परिसरातील एका खासगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीत ती सुमारे सहा महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. तसेच गर्भपात करण्याच्या उद्देशाने तिने काही औषधांचे सेवन केल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला. औषधांचे प्रमाण अधिक झाल्यामुळे तिचा रक्तदाब झपाट्याने कमी झाला आणि तिला वारंवार झटके येऊ लागले. प्रकृती गंभीर बनल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला पुढील उपचारासाठी हिरे शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. तेथील अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू असताना तिची प्रकृती अधिकच खालावली आणि अखेर तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांनी रुग्णालयात भेट देत पंचनामा केला. सध्या या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, एवढ्या प्रगत अवस्थेतील गर्भपातासाठी संबंधित तरुणीला औषधे कोणी दिली, ती कोणाच्या संपर्कात होती, तसेच या मागे कोणते जाळे कार्यरत आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणातील सर्व पैलूंवर सखोल चौकशी सुरू असून पुढील तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

COMMENTS