Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेततळ्यात पडून सासरा-सुनेचा दुर्दैवी मृत्यू

भाळवणी (प्रतिनिधी):- पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथील हिंगणदरा वस्तीवर मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी शेततळ्यातून पाणी काढण्यासाठी गेलेल्या सूने

पावसाळ्यातील संभाव्य आजार टाळण्यासाठी उपाययोजना करा; आमदार आशुतोष काळेंचे आरोग्य विभागाला निर्देश
पारनेर सैनिक बँकेची ऑनलाइन सभा नियमबाह्य असल्याने रद्द करा
अंगावर फुले उधळून झाले बालगोपाळांचे स्वागत…शाळांची वाजली घंटा, मुलांचा किलबिलाट बहरला

भाळवणी (प्रतिनिधी):- पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथील हिंगणदरा वस्तीवर मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी शेततळ्यातून पाणी काढण्यासाठी गेलेल्या सूनेचा पाय घसरून शेततळ्यात पडल्यामुळे तीला वाचवण्यासाठी सासऱ्याने तात्काळ धाव घेतली मात्र त्यांनाही पोहता येत नसल्यामुळे सून व सासऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

      याबाबत अधिक माहिती अशी मुरलीधर मारुती नवले (७० वर्षे) व उज्वला आबा नवले (४० वर्ष) राहणार हिवरे कोरडा तालुका पारनेर असे मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहे. उज्वला नवले या आपल्या शेततळ्यातील पाणी मेंढ्यांना पाजण्यासाठी शेततळ्यावर पाणी काढताना त्यांचा पाय घसरून तळ्यात पडल्याने त्यांना  वाचवण्यासाठी त्यांच्या सासर्‍यांनी तात्काळ धाव घेतली मात्र सासरे वयोवृद्ध असल्यामुळे प्राण वाचवण्यासाठी अपयशी ठरले या घटनेमध्ये सून व सासऱ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यानंतर घटनेची माहिती तात्काळ पारनेर पोलिसांना  कळविण्यात आली मुरलीधर नवले व उज्वला नवले यांचा ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मानसिंग शेलार, पोलीस नाईक सतीश बर्डे हे करत आहेत.

COMMENTS