Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इस्लामपूर नगरपालिकेची चौथी सभाही तहकूब

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर शहरातील भुयारी गटार योजनेचे काम सुरू करा नंतर पुढील विषय चर्चेला घ्या, असा पवित्रा नगरसेवकांनी घेतला. त्यामुळे

मोरगिरी विकास सोसायटीत माजी मंत्र्याच्या पॅनेलकडून विद्यमान मंत्र्यांच्या पॅनेलचा धुरळा
बाल हत्याकांडातील गावित बहिणींची फाशीची शिक्षा रद्द; मरेपर्यंत जन्मठेप
गावच्या सर्वांगीण विकासात सरपंचांची भूमिका महत्त्वाची : भास्करराव पेरे-पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर शहरातील भुयारी गटार योजनेचे काम सुरू करा नंतर पुढील विषय चर्चेला घ्या, असा पवित्रा नगरसेवकांनी घेतला. त्यामुळे आजची चोथी सभा तहकूब करावी लागली. मागील सभेत झालेले ठराव अमलात कधी येणार? या प्रश्‍नावर पालिका प्रशासनाने उत्तर देण्यास टाळाटाळ केली. शहरातील भुयारी गटरच्या कामांसाठी प्रशासनाने 20 जानेवारीपर्यंत मुदत मागितली. त्यानंतरच बाकीचे विषय चर्चेला घेण्यात येणार आहेत. दरम्यान, भुयारी गटर आणि मागासवर्गीय कल्याण समितीची स्थापना या मुद्द्यावर मोठा गदारोळ झाला.
नगराध्यक्ष निशिकांत पाटील, मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या उपस्थितीत सभा झाली. 22 मार्च 2021 रोजी घेण्यात आलेली सभा चार विषयांवर तहकूब झाली होती. हीच सभा सुमारे 8 महिन्यांनी आज घेण्यात आली. सभेच्या प्रारंभी वैभव पवार आणि विक्रम पाटील यांनी यापूर्वीच्या सभेत झालेल्या ठरावांची अंमलबजावणी केंव्हा करणार? असा प्रश्‍न उपस्थित करत मागील विषयांना हात घातला. वैभव पवार यांनी आक्रमकपणे दोन व्यायाम शाळा आणि टॉयलेट ब्लॉकच्या बाबतीत यापूर्वीचे ठराव पालिकेने आधी अमलात आणावेत, अशी आग्रही मागणी केली. यावर दोन्ही बाजूने युक्तिवाद झाले. संभाजी चौकातील एका मंजूर रस्त्याच्या उद्घाटनावरून ’बोगस टेंडर’ असा नामोल्लेख झाल्यामुळे दोन्ही बाजूने मोठा दंगा झाला. बोगस हा शब्द विक्रम पाटील यांनी मागे घ्यावा अशी सूचना संजय कोरे आणि शहाजी पाटील यांनी केली. मात्र, विक्रम पाटील यांनी शेवटपर्यंत ते पाळले नाही. आनंदराव पवार यांनी सुरुवातीपासून मागच्या विशेष सभेला राष्ट्रवादीने दांडी मारल्याने शहराचे कसे नुकसान झाले यावर वारंवार मत प्रदर्शन नोंदवले.
शहरातील भुयारी गटरचे काम राखडल्याच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूंनी गदारोळ झाला. आनंदराव पवार, विक्रम पाटील यांनी या कामाला राष्ट्रवादीचा विरोध असल्याची टीका केली. त्यावर निवडणुकीच्या तोंडावर विकास आघाडी भुयारी गटरचे अपयश प्रशासनावर ढकलत असल्याचा आरोप संजय कोरे यांनी केला. त्यांनी याचा निषेध नोंदवला. हा विषय रेटत पवार यांनी गटरचे काम झाल्याशिवाय बाकीचे विषयच घेऊ नका, असा अट्टाहास धरला. मुख्याधिकारी साबळे यांनी प्रशासकीय पूर्तता करून 20 नंतर यावर निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले. सुरुवातीच्या चर्चेतच ज्येष्ठ नेते बाबासाहेब सूर्यवंशी यांनी विषयपत्रिकेतील मागासवर्गीय कल्याण समितीचा शेवटचा विषय आधी घेण्याची सूचना केली. नंतरच्या चर्चेत या समितीसाठी विकास आघाडीच्या कोमल बनसोडे आधीपासून आग्रही होत्या. या समितीचे सभापतीपद मिळावे, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, राष्ट्रवादीच्या संगीता कांबळे यांची सर्वानुमते सभापतीपदी निवड झाली. शहरातील विकास कामांसाठी भरीव निधीची तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह मंत्री एकनाथ शिंदे, खासदार धैर्यशील माने, मंत्री दिवाकर रावते आणि नगरसेवक आनंदराव पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.

COMMENTS