Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मा.आमदार नितीन पवार यांच्या पाठपुराव्याने जिल्हा परिषद शाळा मनखेड येथे दोन वर्ग खोल्या मंजूर

हतगड- सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मणखेड येथे मा. आमदार नितीन अर्जुन पवार यांच्या पाठपुरव्यामुळे जिल्हा परिषद यांच्या माध्यमातू

भरतीच्या बनावट संदेशामुळे जिल्हा रूग्णालयात गर्दी
शिक्षण आणि मदरसा !
किरीट सोमय्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता | DAINIK LOKMNTHAN

हतगड- सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मणखेड येथे मा. आमदार नितीन अर्जुन पवार यांच्या पाठपुरव्यामुळे जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून दोन वर्ग खोल्या मंजूर झाल्या असून, या कामासाठी अंदाजित रक्कम एकोणीस लाख मंजूर करण्यात आली असून,या वर्ग खोल्या कामाचा भूमिपूजन उद्घाटन सोहळा सरपंच श्री.नर्मदाताई मोहनदास भोये यांच्या शुभहस्ते व तसेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्या प्रसंगी मुख्याध्यापक अंबादास कंनोर, शिक्षक योगेश खंबाईत, रवींद्र गायकवाड, अनिल झिरवाळ, सोपान सानप, शरद पांडे, श्री. प्रतीक्षा मॅडम, तसेच सामजिक कार्यकर्ते मोहनदास भोये , त्यासह गावातील ग्रामस्थ दिनेश महाले, कमलाकर वाघमारे, दिगंबर ब्राम्हणे, शिक्षक गुलाब गवळी, सदाशिव गायकवाड, कैलास कामडी, किशोर गवळी यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होते.

COMMENTS