Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतीच्या वादातून दोघांना मारहाण

निफाड प्रतिनिधी/ द्राक्षबागेच्या अँगलचे काम सुरू असताना आमच्या हद्दीत अँगलचे काम का करतात, अशी कुरापत काढत तिघा जणांनी केलेल्या मारहाणीत दोघे गंभ

विवेक कोल्हे यांची को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या संचालकपदी निवड
तहसीलदारांनी गावात जाऊन जनतेचे प्रश्‍न सोडवावेतमहसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश ; करमाळ्यात सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक :बिनविरोधचा फुगा अखेर फुटला ; पहिल्याच दिवशी 719 अर्जांची विक्री

निफाड प्रतिनिधी/ द्राक्षबागेच्या अँगलचे काम सुरू असताना आमच्या हद्दीत अँगलचे काम का करतात, अशी कुरापत काढत तिघा जणांनी केलेल्या मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना वावी ठुशी येथे घडली. याबाबत माहिती अशी की, वावी ठुशी येथील शेतकरी प्रकाश नामदेव देवरे (वय 63) यांची गट नंबर 65 मध्ये शेती आहे. या शेतामध्ये द्राक्षबागेचे अँगल उचकटले असल्याने ते व्यवस्थित करण्याचे काम मजूर करीत होते. त्याचवेळी शेजारील शेतकरी जयराम रघुनाथ देवरे, मुलगा किरण देवरे, सागर देवरे यांनी आमच्या शेतातील हद्दीत अँगलचे काम का करतात, अशी
कुरापत काढत कटवणीच्या सहाय्याने तिघा संशयितांनी प्रकाश देवरे व सचिन प्रकाश देवरे (वय 36) यांना गंभीर मारहाण केली. या घटनेत सचिन देवरे यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला गंभीर जखम झाली असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर प्रकाश देवरे यांच्या डाव्या हाताला फॅक्चर असून, ते
पिंपळगाव बसवंत येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात जयराम रघुनाथ देवरे, सागर देवरे, किरण देवरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला
असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक
कुणाल सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सचिन कारंडे तपास करीत आहे.

COMMENTS