Homeताज्या बातम्यादेश

डॉक्टर उशिरा आल्याने निष्पाप बालकाचा आईच्या कुशीत मृत्यू.

आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप

मध्यप्रदेश प्रतिनिधी- मध्यप्रदेश मधील जबलपूरच्या बरगी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रूग्णालयाच्या दारात आई आपल्या आजारी मुलाला मांडीवर घ

संवत्सर येथील विद्यार्थ्यांना खगोलशास्त्रा विषयी मार्गदर्शन
बलात्कार, आमदाराला धमकी आणि कर्माची सजा
दुकानासमोर लावलेल्या मोटारसायकलची चोरी

मध्यप्रदेश प्रतिनिधी– मध्यप्रदेश मधील जबलपूरच्या बरगी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रूग्णालयाच्या दारात आई आपल्या आजारी मुलाला मांडीवर घेऊन बसली, पण डॉक्टर पोहोचले नाहीत यामुळे आईच्या कुशीतच मुलाचा मृत्यू झाला. चारगव्हाण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिन्हेटा देवरी येथे राहणारे संजय पांद्रे हे त्यांचा पाच वर्षांचा मुलगा ऋषी पांद्रे याला उपचारासाठी बरगी येथील आरोग्य केंद्रात घेऊन गेले होते, मात्र रुग्णालयात डॉक्टर नव्हते. मात्र अनेक तास उलटून गेले तरी डॉक्टर न आल्याने रुग्णालयाच्या उंबरठ्यावरच आईच्या कुशीत निष्पाप बालकाचा मृत्यू झाला. मृत्यू होऊन अनेक तास उलटले तरी असहाय्य पालकांची अवस्था जाणून घेण्यासाठी कोणीही डॉक्टर व अधिकारी आले नाहीत. संतप्त नातेवाईकांनी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. त्याचवेळी मुलाला वेळीच उपचार मिळाले असते तर आज तो जिवंत असता, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

COMMENTS