Homeताज्या बातम्यादेश

राजधानीत जी-20 परिषदेसाठी चोख सुरक्षा

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः जगभरातील अनेक देशांचे प्रमुख जी-20 परिषदेसाठी भारतात येत असून, ही शिखर परिषद उद्या 9 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबरला नवी दिल्ली

श्रीरामपुरात वाळू तस्करांकडून दोन कोटींचा मुद्देमाल जप्त
कोपरगाव तहसीलदार यांच्यावरील खोटा गुन्हा रद्द करावा : महसूल विभागाचे लाक्षणिक उपोषण
आरटीओ कार्यालयात शासकीय नियम धाब्यावर बसवत सर्वसामान्यांची आर्थिक लूट

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः जगभरातील अनेक देशांचे प्रमुख जी-20 परिषदेसाठी भारतात येत असून, ही शिखर परिषद उद्या 9 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबरला नवी दिल्लीत पार पडणार आहे. या परिषदेसाठी सुरक्षा यंत्रणांची चोख सुरक्षा यंत्रणा ठेवण्यात आली आहे. तसेच परदेशी पाहुण्यांच्या आगमनासाठी सजावट करण्यात आली असून रस्त्यांवर रोशनाई देखील लावण्यात आली आहे. मात्र, यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास देखील सहन करावा लागत आहे.
पोलिसांना दिल्लीतील लोकांना छतावर देखील न जाण्याचे आदेश दिले आहेत. जी-20 शिखर परिषदेची जय्यत तयारी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात भटक्या कुत्र्यांना रस्त्यावरुन उचलून बंदिस्त ठिकाणी डांबण्यात आले होते. त्यानंतर दिल्लीमधील झोपडपट्टी भाग जागतिक नेत्यांना दिसू नये यासाठी हिरव्या रंगाची शेडनेट लावण्यात आली होती. अशातच, आपल्या घरात थांबण्यार्‍या स्थानिकांसाठी पोलिसांनी फर्मान काढले आहे. पोलीसांनी घोषणा केली की 9 आणि 10 सप्टेंबर या दिवशी छतावर येऊ नये. जी-20 परिषदेत जगभरातील नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र, यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सहभागी होणार नाहीत, अशी माहिती समोर येत आहेत. त्यांच्याऐवजी त्यांच्या देशाचे प्रतिनिधी सामील होतील. यावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली की कोणत्या देशाचा नेता येत नाही याने काही फरक पडत नाही. त्यांनी पाठवलेल्या प्रतिनिधीला देशांची बाजू मांडता आली पाहिजे.  

COMMENTS