Homeताज्या बातम्याक्रीडा

भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकीटाचे दर गगनाला भिडलेत

 टी-२० वर्ल्ड कपमधील भारत आणि पाकिस्तानचा सामना आता चर्चेत आला आहे. कारण क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक किंमतीचे तिकीट या सामन्यासाठी विकले जात

माण देशी चॅम्पियन्सच्या उपक्रमामुळे म्हसवडमध्ये जलतरण स्पर्धा; राज्यातील लोकांमध्ये आश्‍चर्य
दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज क्विंटन डी कॉक ची वनडेतून निवृत्तीची घोषणा
भारत-पाक सामन्याची क्रेझ शिगेला अहमदाबादमध्ये हॉटेलचे भाडे 1 लाखांपर्यंत

 टी-२० वर्ल्ड कपमधील भारत आणि पाकिस्तानचा सामना आता चर्चेत आला आहे. कारण क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक किंमतीचे तिकीट या सामन्यासाठी विकले जात आहे. कारण सामान्य माणसाने आपली संपूर्ण प्रॉपर्टी जरी विकली तरी त्याला हे तिकीट घेता येणार नाही. त्यामुळे या तिकीटाची ज्यांनी किंमत ऐकली त्यांना जोरदार धक्का बसला आहे. भारत आण पाकिस्तान यांचा आगामी सामना टी-२० वर्ल्ड कपमध्ये होणार आहे. हा सामना १५ जूनला अमेरिकेतील फ्लोरिडा येथे होणार आहे. या सामन्यासाठी आयसीसीने तिकीट विक्री करायला सुरुवात केली आहे. आयसीसीकडून काही वेब साईट्सने तिकीटी मिळवल्या आहेत. या पुनर्विक्रीमध्ये व्हीआयपी तिकिटांची किंमत सुमारे ३३.१५ लाख रुपयांवर पोहोचली आहे. ज्या वेब साईटवर तिकीट उपलब्ध आहे त्या प्लॅटफॉर्मचे शुल्कही जोडले तर त्याची किंमत सुमारे ४१.४४ लाख रुपये होत आहे. भारत व पाकिस्तान सामन्याचे सर्वात स्वस्त तिकीट StubHub वर १.०४ लाख रुपयांना उपलब्ध आहे, तर SeatGeek वर सर्वात महाग तिकीट प्लॅटफॉर्म शुल्कासह १.८६ कोटी रुपयांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे भारतामधील सर्व सामान्य जनतेला हे तिकीट परवडणार नाही. सामान्य माणसाने आपली पूर्ण संपत्ती विकली तरी त्याला हे तिकीट मिळवता येणार नाही, अशी जोरदार चर्चा क्रिकेट विश्वात सुरु झाली आहे. त्यामुळे आता ही तिकीट नेमकी कोणा घेणार, याची उत्सुकता सर्वांना असेल.

COMMENTS