Homeताज्या बातम्यादेश

केरळमध्ये निपाह व्हायरसचे थैमान

निपाह विषाणूमुळे टाळेबंदीसदृश्य परिस्थिती

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः कोरोनासारख्या भयंकर लाटेतून संपूर्ण जग सावरले असतांना, भारतातील केरळ राज्यामध्ये निपाह व्हायरसने थैमान घातल्यमुळे भारताची

राहुल गांधींना दिलासा
सीसीटीव्ही यंत्रणेसाठी दहा कोटीं रुपयांचा निधी मंजूर
भाजपा सुपर वॉरियर्सचा ‘महाविजय – २०२४’ मेळावा नाशिक येथे पार पडला

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः कोरोनासारख्या भयंकर लाटेतून संपूर्ण जग सावरले असतांना, भारतातील केरळ राज्यामध्ये निपाह व्हायरसने थैमान घातल्यमुळे भारताची डोकेदुखी वाढली आहे. निपाह व्हायरसच्या रुग्णांची संख्या केरळमध्ये दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. केरळ सरकारनेही यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. तामिळनाडूसह कर्नाटकने खबरदारीचा उपाय म्हणून अलर्ट जारी केला असून केरळमध्ये टाळेबंदीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोझिकोड जिल्ह्यामध्ये निपाह व्हायरसने थैमान घातले आहे. आतापर्यंत 5 रुग्णांची नोंद झाली आहे, तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कन्नूर, वायनाड आणि मलप्पूरममध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. 7 ग्रामपंचायतींमध्ये कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. या भागात आणि रुग्णालयांमध्ये मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय कोझिकोडच्या जिल्हा दंडाधिकार्‍यांनी या 7 पंचायतींच्या सर्व शैक्षणिक संस्था, अंगणवाडी केंद्र, बँका आणि सरकारी संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. फक्त औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत उघडण्यास परवानगी आहे. केरळमध्ये निपाह व्हायरसची वाढती रुग्णसंख्या पाहता, तामिळनाडू सरकारने एक परिपत्रक जारी केले आहे. लोकांना केरळच्या ज्या भागात रुग्णसंख्या जास्त प्रमाणात आहे. त्या भागात अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.कर्नाटक सरकारच्या आरोग्य विभागाने केरळच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये (कोडागू, दक्षिण कन्नड, चामराजनगरा आणि म्हैसूर) आणि केरळपासून कर्नाटकात प्रवेश करणार्‍या टोल नाक्यांवरील तपासणीतही वाढ करण्यात आली आहे. केरळमधील आरोग्यमंत्र्यांच्या कार्यालयाने माहिती देताना सांगितले की, कोळीकोड येथील रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या 39 वर्षीय व्यक्तीमध्ये निपाह विषाणू आढळून आला आहे.

प्राणघातक निपाह व्हायरसच्या संसर्गात वाढ- केरळमध्ये प्राणघातक निपाह व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. एका 9 वर्षाचा मुलाला देखील संसर्ग झाला असून डॉक्टर त्याला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. सरकारने मुलावर उपचार करण्यासाठी आयसीएमआरकडून मोनोक्लोनल अँटीबॉडी मागवली आहे. निपाह विषाणू संसर्गासाठी हा एकमेव अँटी-व्हायरल उपचार उपलब्ध आहे. मात्र अद्याप वैद्यकीयदृष्ट्या हे सिद्ध झाले नाही. निपाह मानवाकडून माणसात पसरतो आणि मृत्यू दर जास्त आहे. राज्यात दिसलेला विषाणूचा प्रकार हा बांगलादेशमध्ये आढळला होता.

COMMENTS