Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाटेगावातील शेतकर्‍यांचे उपोषण मागे

चार दिवसात नवीन लाईन टाकण्याचे महावितरणचे आश्‍वासन

कोपरगाव प्रतिनिधी ः वीज वितरण कंपनीकडून अनियमित व कमी दाबाने होत असलेला वीज पुरवठा तीन दिवसात सुरळीत करा, अन्यथा खिर्डी गणेश सब स्टेशनसमोर आमरण उ

शिवद्रोही श्रीपादसह बंधू श्रीकांत छिंदमही तडीपार | DAINIK LOKMNTHAN
पर्यावरण पूरक शाडू मातीची श्री गणेश मूर्ती बनविणे या कार्यशाळाचे आयोजन – आ. मोनिका राजळे 
श्री क्षेत्र महेश्‍वर व अमृतेश्‍वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मंजूर

कोपरगाव प्रतिनिधी ः वीज वितरण कंपनीकडून अनियमित व कमी दाबाने होत असलेला वीज पुरवठा तीन दिवसात सुरळीत करा, अन्यथा खिर्डी गणेश सब स्टेशनसमोर आमरण उपोषणाचा इशारा नाटेगाव येथील शेतकर्‍यांनी दिला होता. शंभरपेक्षा अधिक शेतकरी मंगळवारी सबस्टेशन समोर उपोषणास बसले होते. उपोषण स्थळी कोपरगाव तालुका ग्रामीणचे कार्यकारी अभियंता अभिजीत आचार्य यांनी भेट देऊन नाटेगाव शेती पंप वाहिनीवरील लोड चार दिवसात कमी करून तो सुरळीत करण्याचे लेखी आश्‍वासन देत व काम लगेच चालु केल्याने शेतकर्‍यांनी सुरू केलेले उपोषण मागे घेतले आहे.
नाटेगाव येथील शेतकर्‍यांना खिर्डी गणेश सब स्टेशन मधून अत्यंत कमी दाबाने व अनियमित वीज पुरवठा केला जातो. तसेच दिवसा वीज पुरवठा वारंवार खंडित केला जातो, त्यामुळे शेतकर्‍यांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. शेतकर्‍यांची उभी पिके पाण्याअभावी जळण्यास सुरुवात झाली. त्यातच नाटेगाव फिडर वर येसगाव, ब्राम्हणगाव, पिंपळगाव जलाल, आदी गावच्या हद्दीतील 16 रोहीत्रचा जादा वीजभार टाकलेला आहे. त्यामुळे नाटेगाव येथील शेतकर्‍यांना कमी दाबाच्या वीज पुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना पिकांना वेळेवर पाणी देणे अशक्य व जिकिरीचे झाले आहे. या बाबत शेतकर्‍यांनी वेळोवेळी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी यांच्याकडे तक्रार करुनही उपयोग झाला नाही. शेवटी शेतकर्‍यांनी आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेत उपोषण चालु केले होते. यावेळी  शेतकरी कृती समितीचे पद्मकांत कुदळे, संतोष गंगवाल, तुषार विध्वंस, नितीन शिंदे, प्रवीण शिंदे, विजय जाधव, देवकर, नाटेगावचे शेतकरी अ‍ॅड नितीन पोळ, विकास मोरे, खंडूू मोरे, रामदास मोरे, जनार्दन मोरे, गोरख मोर, डॉ. गोरख मोरे, आप्पासाहेब घोरपडे, गणेश मोरे, केशव मोरे, राजेंद्र मोरे, बाबासाहेब मोरे, शशिकांत तांबे, भरत मोरे, सह ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS