Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईमध्ये टॉयलेटच्या फ्लशमध्ये आढळले हजारो मतदान कार्ड

https://www.youtube.com/watch?v=u7ai7Fkxupo मुंबईमध्ये टॉयलेटच्या फ्लशमध्ये आढळले हजारो मतदान कार्डमुंबईतील एका सोसायटीतील टॉयलेट फ्लशमध्ये नाव,

बुद्धीवादी माणस व्यक्तच होत नाहीत ही आजच्या भारताची प्रमुख समस्या-डॉ.राजेश इंगोले
दुर्देवी ! लग्नाला निघालेल्या वऱ्हाडाच्या वाहनाला अपघात .
वक्फ इस्लामिक संकल्पना; पण, मूलभूत अधिकार नाही!

मुंबईमध्ये टॉयलेटच्या फ्लशमध्ये आढळले हजारो मतदान कार्ड
मुंबईतील एका सोसायटीतील टॉयलेट फ्लशमध्ये नाव, फोटो, पत्ता आदी काहीही माहिती नसलेले हजारो मतदान ओळखपत्र आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावर हा प्रकार उजेडात आल्यामुळे संशय व्यक्त होत आहे. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे पाटील यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एका वेस्टर्न टॉयलेटच्या फ्लशमध्ये हजारो मतदान ओळखपत्राचे गठ्ठे लपवून ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे. या ओळखपत्रांवर मतदारांचे नाव, मतदाराचा फोटो किंवा मतदाराचा पत्ता आदी कोणतीही गोष्ट नाही. पण त्यावर मतदान ओळखपत्र क्रमांक व मतदारांसाठी असणार्‍या सूचना नमूद आहेत. उर्वरित माहिती भरण्यासाठी त्याच्यावर रिकामी जागा ठेवण्यात आली आहे. या ओळखपत्रांवर हॉलमार्क असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे हा प्रकार मतचोरीचा तर नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

COMMENTS