Homeताज्या बातम्या

 अंगात दैवी शक्ती आल्याचे भासवून महिलेवर केले वारंवार अत्याचार

 नाशिक प्रतिनिधी - अंगात दैवी शक्ती आल्याचे भासवून भोंदूबाबाने एका महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार नाशिकच्या उपनगर भागात समोर आला आहे.भ

 केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांचे महिलांनी केले जंगी स्वागत 
कौटुंबिक नात्यांना प्राधान्य! ‘यापुढे कुटुंबातील कोणाही विरुद्ध निवडणूक लढणार नाही’, सुप्रिया सुळेंची बारामतीतून मोठी घोषणा
अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने अनुदान द्या

 नाशिक प्रतिनिधी – अंगात दैवी शक्ती आल्याचे भासवून भोंदूबाबाने एका महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार नाशिकच्या उपनगर भागात समोर आला आहे.भोंदू बाबसह आणखी तिघांवर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विष्णू काशिनाथ वारुंगसे उर्फ देवबाबा याने एका महिलेवर त्याच्या राहत्या घरी आणि इतर ठिकाणी वारंवार महिलेच्या संमतीविना शाररिक संबंध केलं,तर याबाबत कोणालाही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देत आणि अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवले होते. तसेच घर घेऊन देण्याचे आमिष दाखून महिलेकडून सुमारे 5 लाख रुपये घेऊन तिची फसवणूक केल्याचे पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे.तर या संपूर्ण घटनेत विष्णू काशिनाथ वारुंगसे उर्फ देवबाबा याची पत्नी मुलगा आणि मुलगी यांचा देखील समावेश असल्याने देवबाबा सह त्याच्या त्याची पत्नी सुनीता विष्णु वारुंगसे ,उमेश विष्णू वारुंगसे व आणि देवबाबा याची मुलगी अश्या चौघांविरोधात उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे.

COMMENTS