सोयाबीन बियाणे पेरणी, दक्षता घेण्याचे आवाहन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोयाबीन बियाणे पेरणी, दक्षता घेण्याचे आवाहन

अहमदनगर/प्रतिनिधी : सोयाबीन पेरणीसाठी स्वतःकडे उपलब्ध असलेले चांगले बियाणे पेरणीसाठी वापरावे, पेरणीपूर्व बीजप्रक्रीया करावी, चांगली ओल म्हणजे 75 ते 1

पाहा एक्स्प्रेसच्या धडकेतून कसा बचावला तरुण | LOKNews24
अपयशावर मात करून ध्येय साध्य करावे ः प्रा. रामचंद्र राऊत
नपुर शर्माला समर्थन दिले म्हणुन तरूणावर झाला हल्ला.

अहमदनगर/प्रतिनिधी : सोयाबीन पेरणीसाठी स्वतःकडे उपलब्ध असलेले चांगले बियाणे पेरणीसाठी वापरावे, पेरणीपूर्व बीजप्रक्रीया करावी, चांगली ओल म्हणजे 75 ते 100 मि.मि. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी व 3 ते 4 सेंटीमीटर खोलीपर्यंत पेरणी करावी, यासह अन्य अनुषंगीक बाबींचे आवाहन कृषी विभागाने शेतकर्‍यांना केले आहे.
खरीप हंगाम 2022 साठी सोयाबीन पेरणी करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत राज्याच्या कृषी विभागाने शेतकर्‍यांना जाहीर आवाहन केले आहे. याबाबतचे परिपत्रक कृषी आयुक्तांनी प्रसिद्धीस दिले आहे. 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी, प्रति हेक्टरी बियाणे दर 75 किलोवरून 50 ते 55 किलोवर आणण्यासाठी टोकण पद्धतीने किंवा प्लॅटरचा वापर करून पेरणी करावी, सोयाबीनची उगवणक्षमता 70 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास उगवण क्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे, पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी, रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे व नंतर त्याची पेरणी करावी, बियाण्याची पेरणी 3 ते 4 सेंटीमीटर खोलीपर्यंत करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS