लढवय्या सेनानी गमावला

Homeताज्या बातम्यासंपादकीय

लढवय्या सेनानी गमावला

सरंक्षणदलाचे प्रमुख अर्थात सीडीएस बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाल्यामुळे देशावर शोककळा पसरली. रावत यांच्या मृत्यूमुळे

संसद अधिवेशनाच्या निमित्ताने..
सोयीचे राजकारण
राजकारणातील अपरिहार्यता

सरंक्षणदलाचे प्रमुख अर्थात सीडीएस बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाल्यामुळे देशावर शोककळा पसरली. रावत यांच्या मृत्यूमुळे देशाचे मोठी हानी झाली असून, ही पोकळी कधीही भरून निघणारी नाही. मात्र रावत यांच्या मृत्यूनंतर काही प्रश्‍न देखील उपस्थित होतांना दिसून येत आहे. याची चौकशी करण्याची खरी गरज आहे. अति महत्वांच्या व्यक्तीसाठी असलेले हेलिकॉप्टर म्हणून, हवाई दलाच्या एमआय-17 व्ही 5 या हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक महत्वाचे राजकारणी अतिमहत्वांच्या व्यक्तीसाठी या हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येतो. हे हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित मानले जाते. शिवाय उड्डाणापूर्वी सर्व बाबींची खात्री करण्यात येते. हेलिकॉप्टरची चाचणी, शिवाय हवामानाचा अंदाज, या सर्व बाबींचा अंदाज घेऊनच प्रवास केला जातो. शिवाय अतिमहत्वाच्या हेलिकॉप्टरवर असणारा पायलट हा निष्णात असतो. असे असतांना देखील रावत यांच्या हेलिकॉप्टरच्या झालेल्या अपघातावर शंका उपस्थित होताना दिसून येत आहे. नेमक्या कोणत्या कारणांमुळे हा अपघात झाला, याचे कारण चौकशीतून समोर येईलच. शिवाय हेलिकॉप्टर, किंवा विमान कोणत्याही संकटात असल्यास तसे नियंत्रण कक्षाला कळवण्यात येते. मात्र तसा कोणताही संदेश नियंत्रण कक्षाला मिळालेला नाही. त्यामुळे या संपूर्ण दुर्घटनेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होतांना दिसून येत आहे. हे संपूर्ण प्रश्‍न राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्यामुळे, त्याची योग्य प्रकारे हाताळणी करणे गरजेचे आहे. या दुर्घटनेत रावत यांची पत्नी मधुलिका, रावत यांच्या स्टाफमधील ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर आणि लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग यांचा मृत्यू झाला. विंग कमांडर पृथ्वीसिंह चौहान, स्क्वाड्रन लीडर के. सिंग, ज्युनिअर वॉरंट ऑफिसर प्रदीप ए., ज्युनिअर वॉरंट ऑफिसर दास, सतपाल राय, नायक गुरुसेवक सिंग, जितेंद्रकुमार, लान्स नायक विवेककुमार, लान्स नायक साई तेजा यांनाही या दुर्घटनेत प्राणास मुकावे लागले. यामुळे देशाचे झालेले नुकसान कधीही भरून निघणारे नाही. मात्र यामुळे भविष्यातील अशा दुर्घटना नक्कीच रोखता येऊ शकतात.
बिपीन रावत यांनी लष्करप्रमुखपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर लष्कराला अत्याधुनिक रूप देण्यास त्यांनी मोठी मेहनत घेतली. शिवाय पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक करण्याची योजना त्यांचीच होती. त्यामुळे त्यांनी आपल्या आयुष्यात तत्व आणि शिस्तीसोबत कधीही तडजोड केली नाही. सैन्याच्या शिस्तीचे बाळकडून त्यांना बालपणापासूनच मिळाले होते. त्यांचे वडील देखील सैन्यात असल्यामुळे, सैन्याची शिस्त पाहत, अनुभवतच ते लहानांचे मोठे झाले. त्यांचा जन्म 16 मार्च 1958 रोजी डेहराडून येथे झाला. बिपिन रावत यांचे वडील एल. एस रावत देखील लष्करातच होते. लेफ्टनंट जनरल एल. एस. रावत म्हणून ते ओळखले जायचे. वडील लष्कारमध्ये असल्याने बिपिन रावत यांचे बालपण लष्करी शिस्तीमध्येच गेेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण शिमल्यामधील सेंट एडवर्ड स्कूलमध्ये झाले. त्यानंतर बिपीन रावत यांनी इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि ते पुन्हा आपल्या जन्मस्थळी म्हणजेच डेहराडूनला गेले. या अकादमीमधील त्यांची चमकदार कामगिरी पाहून त्यांना स्वार्ड ऑफ ऑनर हे पहिले सन्मानपत्र मिळाले. त्यानंतर बिपिन रावत यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्याचे ठरवले आणि ते अमेरिकेला गेले, तेथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली. अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर बिपिन रावत यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. 16 डिसेंबर 1978 रोजी बिपिन यांचे लष्करात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. तब्बल 43 वर्षांपासून ते लष्करात सातत्याने सेवा देत आहेत. आयुष्यात त्यांनी लष्कराची शिस्त कायम सांभाळली. सैन्यात काम करतांना, एक चुक महागात पडू शकते, याची जाणीव त्यांना होती. सैन्यामध्ये नियोजन आणि शिस्तीला अनन्यसाधारण असे महत्व असून, हे महत्व त्यांनी कायमच जपले. शत्रुला धडा शिकविण्यासाठी अचूक नियोजन करावे लागते. याच नियोजनाच्या जोरावर पाकिस्तान, चीन, या देशांना धडा शिकविला. आज अत्याधुनिक शस्त्रास्त्रसह भारतीय सैन्य सज्ज आहे. यात रावत यांचा सिंहाचा वाटा आहे. रावत यांची सैन्यातील सुरूवात भारतीय लष्कराच्या गोरखा 1 रायफल्सच्या पाचव्या बटालियनमध्ये पहिल्यांदा लष्करी जवान म्हणून संधी मिळाली. इथूनच त्यांचा लष्करामधील कारकिर्दीचा प्रवास सुरू झाला. इथे रावत यांना सैन्याचे अनेक नियम शिकण्याची संधी मिळाली. इथे त्यांनी लष्कराच्या अनेक पदांवर क्रॉप्स, जीओसी-सी, दक्षिण कमांड, आयएमए देहरादून, लष्करी ऑपरेशन्स डायरेक्टोरेट लॉजिस्टिक्स स्टाफ ऑफिसर अशा विविध पदांवर काम केले.

COMMENTS