विनाकारण घराबाहेर फिरल्यास कारवाईः वळसे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विनाकारण घराबाहेर फिरल्यास कारवाईः वळसे

राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी ’ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी काळात नागरिकांनी विनाकारण घरा बाहेर फिरू नका, अन्यथा पोलिस कारवाई करतील, असा इशारा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिला.

गावा गावात सहजपणे उपलब्ध होणार्‍या अवैध हातभट्टीच्या दारू विक्री थांबवावी
लिफ्टची टेस्टिंग सुरू असताना गाडीसह लिफ्ट कोसळली अन् पुढे…| LOK News 24
एमपीएससी मायाजाल; विद्यार्थ्याची आत्महत्या

मुंबई/प्रतिनिधीः राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी ’ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी काळात नागरिकांनी विनाकारण घरा बाहेर फिरू नका, अन्यथा पोलिस कारवाई करतील, असा इशारा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिला.

संचारबंदीच्या काळात लोकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करा. जिल्हा अंतर्गत आणि इतर राज्यांतूनही वाहतूक प्रवास करता येईल; मात्र विनाकारण बाहेर पडल्यास पोलिस कारवाई करतील. वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदीची व्यवस्था करण्यात आली आहे. मागच्या वेळची टाळेबंदी आणि आत्ताची संचारबंदी यामध्ये फरक आहे; मात्र लोकांनी स्वतःहून काळजी घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी जाहीर केल्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी, ’सरकारने जाहीर केलेले पॅकेज म्हणजे केवळ धूळफेक’ असल्याची टीका केली होती. याबाबत वळसे पाटील म्हणाले, की फडणवीस यांच्या टीकेला काही अर्थ नाही. सरकारने गोरगरिबांसाठी पॅकेज जाहीर केले आहे, त्याचा लोकांना संचारबंदीच्या काळात फायदाच होणार आहे.

COMMENTS