नगरच्या सनफार्मा कंपनीत आग लागून कामगाराचा मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरच्या सनफार्मा कंपनीत आग लागून कामगाराचा मृत्यू

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरच्या नागापूर एमआयडीसीतील सनफार्मा या औषध निर्मिती करणार्‍या कंपनीला बुधवारी रात्री साडेआठ-नऊच्या सुमारास भीषण आग लागून रावसाहे

Ahmednagar : टिंग्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश | LOKNews24
शेतपाणंद रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी
भाचेबा तुमच्या मतदारसंघाप्रमाणे मामाच्या मतदारसंघाकडे लक्ष द्या : जयंत पाटील यांची भाचे तनपुरेंकडे मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरच्या नागापूर एमआयडीसीतील सनफार्मा या औषध निर्मिती करणार्‍या कंपनीला बुधवारी रात्री साडेआठ-नऊच्या सुमारास भीषण आग लागून रावसाहेब कडु महागडे (वय 52,रा. चेतना कॉलनी, नवनागापूर, मूळ रा. औरंगाबाद) या कामगाराचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशामक पथकाच्या पाच बंबांनी अथक पाण्याचा मारा केल्याने तब्बल अडीच तासाने रात्री साडेअकराच्या सुमारास आग आटोक्यात आली. या आगीत कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शॉर्टसर्किटने ही आग लागल्याचे समजते. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसानी जळिताच्या घटनेची नोंद केली आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील आयसीयू विभागाला महिनाभरापूर्वी लागलेली आगीची घटना ताजी असतानाच, एमआयडीसीतील सनफार्मा कंपनीला बुधवारी (दि.8) रात्री नऊच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीच्या घटनेत कंपनीतील एका कर्मचार्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रावसाहेब कडु महागडे (वय 52,रा. चेतना कॉलनी, नवनागापूर, मूळ रा. औरंगाबाद) असे मृत कामगाराचे नाव आहे. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेबाबतची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक युवराज आठरे यांनी दिली. या आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात येत असून अग्निशमन पथकाच्या अडीच तासाच्या अथक परिश्रमानंतर रात्री साडेअकरा वाजता ही आग आटोक्यात आली. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आगीची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अजित पाटील, पोलिस निरीक्षक आठरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मनपाच्या अग्निशमन विभागाच्या दोन, एमआयडीसीच्या दोन व राहुरी नगर परिषदेची एक अशा पाच अग्निशमन गाड्या पाचरण करण्यात आल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच कंपनी परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. आगीची भीषणता व सुरक्षेच्या कारणास्तव यावेळी कोणालाही कंपनीच्या आवारात प्रवेश दिला नाही. आगीच्या घटनेत जखमी झालेले रावसाहेब महागडे यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वी त्यांचे निधन झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. सुदैवाने या घटनेत अन्य कोणीही जखमी झाले नाहीत.
नगर-मनमाड महामार्गावरील नागापूर एमआयडीसीच्या प्रवेशद्वाराजवळच सन फार्मा ही कंपनी आहे. या कंपनीच्या आवारात वेगवेगळे प्लँट असून आतील एका प्लँटला आग लागली होती. सन फार्मा या औषधांच्या कंपनीत तीन लिक्विडचे प्रकल्प आहेत. याच प्रकल्पाशेजारील रुमला ही आग लागली होती. ती आग कंपनीत पसरली होती. त्यामुळे या आगीची तीव्रता मोठी असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आग लागली त्या ठिकाणी काही कामगार काम करीत होते. त्यातील एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. लागलेली आग मोठी असल्याने यात मोठे नुकसान झाले असण्याची शक्यता आहे.
महिनाभरापूर्वी भाऊबीजेच्या दिवशी जिल्हा शासकीय रुग्णालयातील आयसीयू विभागाला भीषण आग लागली होती. या घटनेत 14 करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयाची ही घटना होऊन महिन्याचा कालावधी झाला असतानाच भीषण आगीची दुसरी घटना एमआयडीसीतील सनफार्मा कंपनीत बुधवारी (दि.8) रात्री घडली. कंपनीतील लोडिंग-अनलोडिंग यार्डमध्ये रात्री 9 वाजेच्या सुमारास केमिकल सॉलवंटला अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच कंपनीच्या व्यवस्थापक व कर्मचार्‍यांनी तात्काळ एमआयडीसी अग्निशमन विभाग व महापालिका अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. आग मोठी असल्याने आग व धुराचे लोळ लांबपर्यंत दिसून येत होते. आग विझविताना अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍यांना एक मृतदेह आढळून आला. घटनास्थळावर बघ्याची गर्दी वाढली होती. एमआयडीसीचे पोलिस पथकही घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी गर्दी पांगवली. दरम्यान, सहा वर्षांपूर्वीही याच कंपनीतील केमिकलला आग लागली होती. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता.

COMMENTS