भारतीय समाजात महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक ऐतिहासिक आणि क्रांतिकारक पावलं उचलली गेली. हिंदू कोड बिल मुळे महिलांना कायदेशीर हक्क आणि सन्मान प्रा

भारतीय समाजात महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक ऐतिहासिक आणि क्रांतिकारक पावलं उचलली गेली. हिंदू कोड बिल मुळे महिलांना कायदेशीर हक्क आणि सन्मान प्राप्त झाला. या कायद्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा संघर्ष होता. त्यांनी महिलांच्या अधिकारांसाठी स्वतःचा राजीनामाही दिला. इतका मोठा त्याग इतिहासात दुर्मिळ आहे. संघर्षाची परंपरा बघा. महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध लढा देत शिक्षणाची क्रांती घडवली. त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी स्वतःचे घरही सोडले. सावित्रीबाई फुले यांच्या पाठीशी उभं राहत त्यांनी स्त्रीशिक्षणाचा पाया घातला.आजची वास्तवस्थिती काय आहे? इतका मोठा संघर्ष आणि क्रांती घडूनही आज खरात सारख्या घटनांमध्ये अनेक महिला अंधश्रद्धा आणि खोट्या बाबांच्या जाळ्यात अडकताना दिसतात. चिंताजनक बाब म्हणजे या महिलांमध्ये केवळ अशिक्षितच नाहीत, तर सुशिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि समाजात उच्च पदावर असलेल्या महिलांचाही समावेश आहे. जबाबदारीच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या स्त्रियाही जर अशा घटनांमध्ये सहभागी होत असतील, तर हा प्रश्न केवळ व्यक्तींचा राहत नाही. तो संपूर्ण समाजाच्या वैचारिक स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. मूलभूत प्रश्न काय आहे? शिक्षण वाढलं, पदव्या मिळाल्या, आर्थिक स्वावलंबन वाढलं. मगही विचारांची प्रगल्भता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन का कमी पडतो? खरं शिक्षण म्हणजे केवळ माहिती किंवा पदवी नव्हे, तर विवेक, प्रश्न विचारण्याची सवय आणि योग्य-अयोग्य यातील फरक ओळखण्याची क्षमता आहे. आज गरज आहे ती केवळ शिक्षणाची नाही, तर जागृतीची आणि वैचारिक क्रांतीची. स्त्री सशक्त होणं महत्त्वाचं आहेच, पण त्याहून अधिक महत्त्वाचं म्हणजे ती सजग, विचारशील आणि अंधश्रद्धेविरुद्ध ठामपणे उभी राहणारी असावी. पहिला वार हा तिच्या मानसिकतेवर केल जाते. म्हणजे ती शब्द गिळून गुलामीच्या साखळीत कैद राहील. प्रश्न न करता कुठल्या तरी प्रथेला स्वीकारून संस्कृती, संस्कारच नाव देऊन त्यात कैद होईल.. दिलेले हक्क टिकवण्यासाठी, विचारांची ताकद आणि माणुसकीची जाणीव जागी ठेवणं. हीच खरी प्रगती आहे. आंधळा विश्वास माणसाला विचारशून्य बनवतो, मग बहिणाबाई चौधरी अडाणी वाटतात, संत कबीर यांचे तत्त्वज्ञान कळत नाही,आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्यही जातीत मोजले जाते…जिथे माणुसकीचं मोल समजायला हवं, तिथे अजूनही जाती, पद, आणि संपत्तीच्या मापदंडावर माणसं तोलली जातात. सुशिक्षित असणं म्हणजे खरं काय हे शोधून न काढता स्वतःला इतकं झोकून देणं नसते. आज त्या चांगल्या पदावर असलेल्या महिला असोत किंवा समाजातील इतर सुशिक्षित महिला धनसंपत्ती असूनही विचारांनी गरीब असणं, हेच खरं दु:खद वास्तव आहे. शिक्षण वाढलं, पण संस्कार आणि माणुसकी अजूनही मागे पडली आहे…
सावित्रीबाई फुले अक्षरांची ज्योत पेटवून गेल्या, अंधार फोडण्यासाठीपण आजही काही मनं प्रकाशापेक्षा सावल्यांवरच विश्वास ठेवतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधानात लिहिलं स्वातंत्र्य, पण विचारांच्या भिंतींवर गुलामीचे शिलालेख अजून कोरलेले गौतम बुद्ध दीप स्वतः बनायला सांगून गेले, पण आपण अजूनही इतरांच्या हातातल्या दिव्यांवर जगतोयकाळ बदललाशहरं उजळलीमॉल, गार्डन, रस्ते सगळं चमकू लागलंपण नात्यांचं काय? क्षणिक स्पर्शात प्रेम शोधलं जातंय आणि त्या शोधात आदर हरवतोय, जपणूक हरवतेय, आणि स्त्री स्वतःच्याच भावनांमध्ये हरवतेय आणि मग दुसर्या टोकाला उभा असतो बाबाश्रद्धेच्या नावाने स्पर्शाची परवानगी घेतोकृपाच्या नावाखाली सीमा ओलांडतोस्त्रीच्या विश्वासाचं शरीरात रूपांतर होतंआणि त्या क्षणी ती भक्त नसते.ती फक्त एक वापरलेली सावली असते. घटना घडतात आवाज उठतात पण उशीर झालेला असतोप्रश्न समाजाला नाही. प्रश्न आहे त्या क्षणाला, जिथे विवेक गप्प बसतोजिथे शिक्षण हरवतंआणि अंधश्रद्धा जिंकतेशिकणं म्हणजे फक्त वाचणं नाहीतर ओळखणं काय चुकीचं आहे,आणि त्याला थांबवणं राख झाली आहे विचारांची पण अजून उरलेत ठिणग्याजागं व्हायचं असेल, तर बाहेर नाही स्वतःच्या आत आग पेटवावी लागेल कारण विवेक जागा झाला की, कोणताही बाबा उरत नाहीआणि स्त्री कोणाच्याही सावलीत नव्हे, तर स्वतःच्या प्रकाशात जगायला शिकते. काही स्त्रिया भोंदू बाबांच्या मागे फिरतात कोणीतरी येईल, सगळं ठीक करेल या आशेवर जगतात. पण सत्य खूप साधं आहे कोणीही येणार नाही तुम्हाला वाचवायला तुमचं आयुष्य तुमच्या निर्णयांनीच घडतं खरं सक्षमीकरण म्हणजे काय? स्वतः विचार करणं चुकीच्या गोष्टींना नाही म्हणणं नात्यात स्वतःचा सन्मान जपणं आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःवर विश्वास ठेवणं पुस्तकं हातात आली, पण विचार अजून झोपेत, मुक्ती शोधतो बाहेर, पण ती आहे आपल्या आतच जागं व्हा कारण काळ बदललाय, पण जर विचार बदलले नाहीत तर काहीच बदलणार नाही.माईने शेण, चिखल अंगावर झेलून शिक्षण देऊन मोकळ आकाश दिल. त्या माउलीचे योगदान या वागणुकीने दिल जाते. सतीप्रथेमधून मुक्त केल, केशवपण मिटवलं, विधवेला पुनरविवाह मान्यता देण्यासाठी संघर्ष इत्यादी. अक्षर ओळखण्यात चूक झाली तरी निसर्गाने बुद्धी दिली आहे इतकं विश्वास ठेवून स्वतःच शिक्षण बुद्धिवरच जंग नसेल काढतं तर काय अर्थ? इतका मोठा संघर्ष, त्याग! भीती, चमत्कार किंवा खोट्या आश्वासनांना बळी पडू नका. प्रत्येक गोष्ट तार्किक दृष्टिकोनातून पाहा.शिक्षणाचा खरा अर्थ समजा. फक्त पदवी नव्हे, तर विवेक, आत्मभान आणि योग्य-अयोग्य ओळखण्याची क्षमता विकसित करा. स्वतःला सक्षम बनवा. भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत असणं, फसवणुकीपासून वाचवतं. एकमेकींचा आधार बना स्त्रियांनी स्त्रियांसाठी उभं राहणं खूप गरजेचं आहे. चुकीला साथ न देता, योग्य गोष्टीला समर्थन द्या. चुकीच्या गोष्टींना विरोध कराभीती न बाळगता आवाज उठवा, घरात, समाजात, कुठेही अन्याय दिसला तर. सजग स्त्री हीच सशक्त स्त्री आणि सशक्त स्त्रीच समाज बदलू शकते.
प्रा. प्रिया मेश्राम
मो : 7588296094

COMMENTS