Homeताज्या बातम्यादेश

राहुल गांधींनी रायबरेलीमधून भरला उमेदवारी अर्ज

नवी दिल्ली : काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवत असतांना, गांधी यांनी शुक्रवारी रायबरेली लोकसभा मतदारसंघातू

राहुल गांधींनी अंबाला ते चंदीगड असा ट्रकने प्रवास केला
महिला आरक्षणावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न ः राहुल गांधी
‘भाईयो और बहनो…’ म्हणत राहुल गांधींनी केली पंतप्रधान मोदींची नक्कल

नवी दिल्ली : काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवत असतांना, गांधी यांनी शुक्रवारी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जोरदार शक्ति प्रदर्शन राहुल गांधी यांनी केले. अर्ज दाखल करतांना राहुल गांधी यांच्या सोबत आई सोनिया गांधी, बहिणी प्रियंका गांधी आणि अशोक गेहलोत यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते.
2019 लोकसभा निवडणुकीत देखील राहुल गांधी अमेठी आणि वायनाड या मतदारसंघातून उभे होते. मात्र अमेठीतून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता, तर वायनाड मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर 2014 मध्ये राहुल गांधी पुन्हा एकदा रायबरेली आणि वायनाड या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. गांधी यांनी रायबरेली निवडणूक कार्यालयात पोहोचत उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रायबरेली मतदार संघातून निवृत्तीची घोषणा करत सोनिया गांधी यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला होता. त्यांच्या जागेवर त्यांचे चिरंजीव राहूल गांधी यांना काँग्रेसने रायबरेलीतून उमेदवारी दिली आहे.शुक्रवारी सकाळी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. काँग्रेसने जोरदार शक्ति प्रदर्शन करत राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला. रायबरेली येथून गेल्या 20 वर्षांपासून सोनिया गांधी या खासदार म्हणून निवडणून आल्या आहेत.

COMMENTS