Homeताज्या बातम्यादेश

देशातील 30 पैकी 29 मुख्यमंत्री कोट्यधीश

सर्वात श्रीमंत आंध्रचे तर गरीब पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री

नवी दिल्ली/प्रतिनिधी :नुकताच असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर)चा अहवाल समोर आला असून, यात देशातील 30 मुख्यमंत्र्यापैकी 29 मुख्यमंत्री को

’मविआ’ कोणतीही फूट पडणार नाही ः खा.डॉ. अमोल कोल्हे
भारतीय स्टेट बँकेला एक कोटीं रुपयांचा दंड
खंबाटकी घाटात अपघात; दोन ट्रक जळून खाक

नवी दिल्ली/प्रतिनिधी :नुकताच असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर)चा अहवाल समोर आला असून, यात देशातील 30 मुख्यमंत्र्यापैकी 29 मुख्यमंत्री कोट्याधीश असल्याचे समोर आले आहे. यात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी सर्वात श्रीमंत असल्याचे समोर आले आहे.
देशभरात सध्या तपास यंत्रणांचा बोलबाला असतांना, असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या रिपोर्टमधून मुख्यमंत्र्यांची संपत्ती, दाखल गुन्हे व असलेल्या देण्यांबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार देशातील 30 मुख्यमंत्र्यांपैकी 29 मुख्यमंत्री कोट्यधीश आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री  जगन मोहन रेड्डी हे सर्वात श्रीमंत आहेत. त्यांच्याकडे 510 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सर्वात गरीब मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे सर्वात कमी म्हणजे 15 लाख रुपये इतकी संपत्ती आहे.  देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रतिज्ञा पत्राचा आधारे एडीआर आणि इलेक्शन वॉच या संस्थांनी हा अहवाल तयार केला आहे. जम्मू काश्मीरमध्ये सध्या मुख्यमंत्री नसल्याने हे राज्य वगळण्यात आले आहे. सर्व मुख्यमंत्र्यांच्या सरासरी संपत्तीचा आकडा काढला,  तर तो 33.96 कोटी रुपये इतका भरतो. 30 पैकी 13 म्हणजे 43 टक्के मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण आदी स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्र्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर जगनमोहन रेड्डी आहेत. त्यांच्यानंतर अरुणाचल प्रदेशचे पेमा खंडू दुसर्‍या क्रमांकावर आहेत. खंडू यांची संपत्ती 163 कोटी रुपये इतकी आहे. ओडिशाचे नवीन पटनाईक 63 कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसर्‍या क्रमांकावर आहेत.

मुख्यमंत्री शिंदेंकडे 11 कोटीची संपत्ती आणि 18 गुन्हे – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 11 कोटी 56 लाख 12 हजार रुपयांची संपत्ती आहे. सर्वाधिक देणे असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत शिंदे तिसर्‍या क्रमांकावर असून, त्यांची देणी 3 कोटी 74 लाख 60 हजार रुपयांची आहेत. सर्वाधिक गुन्हे दाखल असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये चंद्रशेखर राव 64  गुन्ह्यांसह पहिल्या क्रमांकावर आहेत. यात 37 गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर 47 गुन्हे दाखल असून, त्यातील दहा गुन्हे गंभीर स्वरुपाचे आहेत. तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या जगनमोहन रेड्डी यांच्यावर 38 गुन्हे असून, त्यातले 35 गंभीर स्वरूपाचे आहेत. तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर 18 गुन्हे दाखल असून, त्यातील एक गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे,

COMMENTS