Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चौपदरी रस्त्यांचा 187 कोटींचा मंजूर निधी गेला परत

जबाबदारी कुणाची ? जवळके आणि रांजणगाव ग्र्रामस्थांचा सवाल

कोपरगाव/प्रतिनिधी ः उत्तर भारतीयांना पुणे आणि दक्षिण भारताला जोडण्यात महत्वाची भूमिका निभावणार्‍या तळेगाव मार्गे कोपरगाव - संगमनेर रस्त्याच्या भा

मित्राच्या निधनाचा धक्का पचेना, 28 वर्षांच्या तरुणाची आत्महत्या | LOKNews24
घरफोडी गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार पोलिसांकडून अटक
राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा जनता दरबार ठरतोय चर्चेचा विषय…

कोपरगाव/प्रतिनिधी ः उत्तर भारतीयांना पुणे आणि दक्षिण भारताला जोडण्यात महत्वाची भूमिका निभावणार्‍या तळेगाव मार्गे कोपरगाव – संगमनेर रस्त्याच्या भाग असलेला झगडेफाटा ते वडगाव पान या 33 कि.मी. रस्त्यासाठी आशियायी विकास बँकेचा सुमारे 187.83 कोटींचा निधी मंजूर होऊनही तो परत गेला आहे असल्याची माहिती, माहिती अधिकारात नानासाहेब जवरे यांच्या हाती आली आहे. मग याचे श्रेय कोणाचे ? असा तिखट सवाल जवळके आणि रांजणगाव देशमुख आदी परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, आशिया व अतिपूर्वेकडील देशांच्या आयोगाने (इकॅफे) पुरस्कारिलेली ही बँक डिसेंबर 1966 मध्ये कार्यान्वित झाली. इकॅफे प्रदेशामधील व बाहेरील मिळून 44 देश व प्रदेश या बँकेचे सदस्य आहेत (30 एप्रिल 1974).या देशांतील खाजगी व सरकारी भांडवलगुंतवणुकीस प्रोत्साहन देणे, त्यांच्या विदेश व्यापाराची, विशेषतः आंतरप्रदेशीय व्यापाराची, वाढ व्हावी म्हणून आर्थिक व तांत्रिक साहाय्य पुरविणे, कृषिउद्योग आणि सार्वजनिक प्रशासन विषयक राष्ट्रीय वा प्रदेशीय पातळीवर कार्य करीत असलेल्या संस्थांच्या वाढीसाठी किंवा पायाभूत सुविधा निर्मिती, नवीन संस्थांच्या स्थापनेसाठी तांत्रिक साहाय्य देणे आणि सदस्य-देशांतील साधनसामग्रीचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करून आर्थिक विकासास हातभार लावणे ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी बँकेची स्थापना झाली.सदर बँकेने राज्याचा 30 टक्के हिस्सा व या बँकेचा 70 टक्के निधी देण्याच्या बोलीवर तळेगाव मार्गे कोपरगाव तालुक्यातील झगडेफाटा ते संगमनेर तालुक्यातील वडगाव पान फाटा या 33.156 कि.मी. रस्त्यासाठी सुमारे 187.83 कोटी रुपयांचा निधी सन-2018 साली मंजूर केला होता.यात आशियायी विकास बँकेने या रस्त्यासाठी राज्याचा 30 टक्के हिस्सा व या बँकेचा 70 टक्के निधी देण्याच्या बोलीवर राज्य मार्ग क्रमांक 65 कि.मी.69 ते कि.मी.103.200 या तळेगाव मार्गे कोपरगाव तालुक्यातील झगडेफाटा ते वडगाव पान फाटा या 33.156 कि.मी.रस्त्यासाठी सुमारे 187.83 कोटी रुपयांचा निधी (म्हणजेच प्रति कि.मी.5.67 कोटी रुपये आर्थिक तरतूद ) सन-2018 साली मंजूर केला होता.त्यासाठी राज्याचा हिस्सा 30 टक्क्याने 56.340 कोटी तर आशियायी विकास बँकेचा हिस्सा 70 टक्क्याने 131.481 कोटी येत होता.मात्र याकडे कोपरगाव आणि संगमनेर तालुक्यातील राजकीय नेत्यांनी दुर्लक्ष केले आहे.त्यासाठी नगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंडळ अभियंता जे.डी.कुलकर्णी यांनी दि.25 सप्टेंबर 2020 रोजी पाहणी दौरा करून अहवाल तयार करून प्रकल्प संचालक आशियायी बँक सहाय्यित प्रकल्प तथा मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कोकण मुंबई यांना पाठवला होता.याबाबत नुकतीच माहिती अधिकारात धक्कादायक माहिती जा.क्रं.288/2023 दि.22 फेबु्रवारी 223 अन्वये हाती आली आहे. सदर माहितीत अहवाल तयार करण्यासाठी राज्य शासनाने पुणे येथील आर्किटेक्नो कन्सल्टंट इंडिया प्रा.ली.चेतक इंजिनिअर्स पुणे यांची नियुक्ती केली होती.त्यांनी या मंजुरीत कायम खराब होणारा सखल भागातील रस्त्याचे काँक्रिटीकरण व अनेक ओढे,नाले,आणि रस्त्यावर मोठे पूल,प्रत्येक गावात चार पदरी रुंद रस्ता आदीं कामांचा समावेश होता.सदर रस्त्याची रुंदी सिन्नर शिर्डी रस्त्याच्या रुंदी इतकी ऐसपैस होती.यात सतरा साखळी क्रमांकात हायड्रोलीक कॅल्क्युलेशनची तपासणी करून नवीन पाईप मोर्‍या समाविष्ट करण्यात आल्या होत्या.
सदरचा 187.83 निधी परत गेल्याने सगळे मुसळ केरात गेले आहे. रस्त्याचा अन्याय हा सहनशीलतेच्या पलिकडे गेला होता. त्यामुळे पोहेगाव, शहापूर, बहादराबाद, जवळके, धोंडेवाडी, बहादरपूर, अंजनापूर, रांजणगाव देशमुख, काकडी, डांगेवाडी, मनेगाव, चिंचोली, वेस-सोयगाव आदी गावातील ग्रामस्थानीं तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली आहे. व सदर निधी पुन्हा एकदा पाठपुरावा करून परत आणावा अशी मागणी जनमंगल ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव थोरात, गंगाधर रहाणे, बाळासाहेब चि.रहाणे, माजी सरपंच वसंत थोरात, बंडोपंत थोरात, उपसरपंच रामनाथ पाडेकर, नामदेव थोरात, डी.के.थोरात, माजी उपसरपंच विजय थोरात, दत्तात्रय थोरात, रावसाहेब थोरात, कौसर सय्यद, बाबासाहेब गव्हाणे, कैलास गव्हाणे, नरहरी पाचोरे, भाऊसाहेब गव्हाणे, प्रकाश थोरात, बंडोपंत देशमुख, संजय गुंजाळ, नामदेव दिघे, पाटीलभाऊ दिघे आदींनी केली आहे.

COMMENTS