Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वृक्षतोडप्रकरणी कर्जत महावितरणला नोटीस

कर्जत/प्रतिनिधी ः महावितरण कार्यालयाजवळ वृक्षतोड झाल्याची पाहणी नगरपंचायतच्या कर्मचार्‍यांकडून करण्यात आलेली आहे. याबाबत नगरपंचायतच्या वतीने महाव

माळढोक संपवण्यामध्ये अजित पवार, बबनराव पाचपुते मुख्य सूत्रधार
महाराष्ट्रातील मराठी माणसाचा कणा मोडलेला का?
अहमदनगरच्या जिल्हा माहिती अधिकारी पदी डॉ. रवींद्र ठाकुर रुजू

कर्जत/प्रतिनिधी ः महावितरण कार्यालयाजवळ वृक्षतोड झाल्याची पाहणी नगरपंचायतच्या कर्मचार्‍यांकडून करण्यात आलेली आहे. याबाबत नगरपंचायतच्या वतीने महावितरणला कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे. विनापरवाना वृक्षतोड केल्यासंदर्भात विचारणा केलेली आहे. 2 दिवसात लेखी उत्तर मागवलेले आहे. त्या उत्तराच्या अनुषंगाने नगरपंचायतकडून योग्य कारवाई केली जाणार असल्याची माहिती कर्जत नगरपंचायतचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी कर्जत नगरपंचायत हद्दीमध्ये महावितरण कार्यालयाजवळ मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याचा प्रकार घडला. प्रादेशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना महावितरणकडून पत्र देण्यात आल्याचे प्रभारी उपविभागीय अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले होते. मात्र असे कोणतेही पत्र प्राप्त झालेले नसल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महावितरणने नगरपंचायत तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी यांची परवानगी न घेता हे वृक्षतोड केल्याचे दिसत आहे. कर्जत शहरातील महामार्गालगतच  हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने वृक्षतोड झाल्याच्या ठिकाणी मूक आंदोलन केले आहे.

COMMENTS