Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भक्ताकडून 20 लाखाचा सुवर्ण मुकुट साईचरणी अर्पण

शिर्डी/प्रतिनिधी ः शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. साईबाबांना गुरु स्वरुप मानत हजारो साईभक्त गुरुचरणी नतमस्तक होत

खतांच्या वाढीव किमती तातडीने कमी करा ; शेतकरी मराठा महासंघाची मागणी
सोन्याचे मंगळसूत्र धूम स्टाईलने पळवले
अहमदनगर शहराला भविष्यातील पूरामुळे गंभीर धोका  

शिर्डी/प्रतिनिधी ः शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. साईबाबांना गुरु स्वरुप मानत हजारो साईभक्त गुरुचरणी नतमस्तक होत आहेत. गुरूपोर्णिमेच्या पार्श्‍वभूमीवर आंध्रप्रदेश येथील साईभक्त वामसी कृष्णा विटला यांनी साईबाबांना अनोखी गुरुदक्षिणा दिली आहे. 355 ग्रॅम वजनाचा 20 लाख रुपये किंमतीचा सोन्याचा मुकुट वामसी कृष्णा यांनी साईचरणी अर्पण केला. दुपारच्या आरतीवेळी हा सोन्याचा मुकुट साईबाबा संस्थानकडे सुपुर्द करण्यात आला. वामसी कृष्णा आणि त्यांच्या परिवाराच्या इच्छेखातर हा मुकुट आज साईबाबांच्या मुर्तीला परिधान करण्यात आला. साईबाबा संस्थानच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांचे हस्ते वामसी कृष्णा आणि परिवाराचा सत्कार करण्यात आला.

COMMENTS