Homeताज्या बातम्यामनोरंजन

CID मालिकेच्या निर्मात्याचे निधन

मुंबई प्रतिनिधी - आपल्या लहानपणापासून सुरू असलेल्या मालिका या आपल्या आठवणींत आजही आहेत त्यातीलच एक होती ती म्हणजे सीआयडी ही मालिका आपल्या ड

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातच मिळणार रहिवासी दाखला
विरोधकांची तपास यंत्रणांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव
तीन दुचाकीसह चार चोरांना पोलिसांनी केले जेरबंद

मुंबई प्रतिनिधी – आपल्या लहानपणापासून सुरू असलेल्या मालिका या आपल्या आठवणींत आजही आहेत त्यातीलच एक होती ती म्हणजे सीआयडी ही मालिका आपल्या डोळ्यासमोर आली की ‘कुछ तो गडबड हैं दया’ हा डायलॉग आठवत असेलच. एसीपी प्रद्युम्न यांच्या तोंडातून बाहेर पडणारं हे वाक्य आपल्याला पाठही झालं असेलच. या मालिकेतली हरएक पात्र हे प्रेक्षकांच्या कायमच स्मरणात राहणार आहे. परंतु ही जादू आपल्यापर्यंत पोहचवण्याचा विडा ज्यांनी उचलला त्या निर्मात्यांचे नुकतेच निधन झाले आहे. याची माहिती ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांनी इन्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर करत दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक भावूक मेसेज आपल्या पोस्टमध्ये लिहिला आहे. गेल्या 20 वर्षांपासून ही मालिका सूरू आहे. सीआयडी मालिकेचे निर्माते प्रदीप उप्पर यांचे सिंगापूर येथे निधन झाले आहे. त्यांचे निधन हे कर्करोगानं झाले असून त्यावर ते बराच काळ उपचारही घेत होते. अनेक मुलाखतींतून शिवाजी साटम यांनी आपल्यासोबतच्या प्रदीप उप्पर यांच्या आठवणी सांगितल्या आहेत. काल त्यांनी शेअर केलेल्या इन्टाग्राम पोस्टनंतर चाहत्यांनीही प्रदीप उप्पर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सीआयडीसोबतच ‘आहट’, ‘सतरंगी सुसराल’, ‘सुपरकॉप्स व्हर्सेस सुपर व्हिलन्स’ अशा काही लोकप्रिय मालिकांचीही निर्मिती केली होती. त्यांचा ‘नेल पॉलिश’ हा सिनेमा शेवटची निर्मिती असणारा ठरला.

COMMENTS