Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री विशाल गणेश मंदिराचा परिसर महिलांच्या अथर्वशिर्ष पठणाने दुमदुमला

अहिल्यानगर : शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे गणेशोत्सवानिमित्त सामुहिक अथर्वशिर्ष पठण व महाआरती करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर विणा

सर्वपक्षीय बैठकीच आवाहन म्हणजे लबाडाघरचे आमंत्रण
‘शिवसृष्टी’ निर्मितीसाठी शासनाकडून सर्वतोपरी सहाय्य – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गोदावरी ‘शुद्ध’ की चाटूगिरीचा महापूर? प्रसिद्धी पत्रकावरून बातमीदारी करणार्‍यांच्या अकलेची नांदेडकरांना कीव!
Displaying IMG_20250905_123910.jpg

अहिल्यानगर : शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे गणेशोत्सवानिमित्त सामुहिक अथर्वशिर्ष पठण व महाआरती करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर विणा दिघे, अमृता  बेडेकर, सरोज पालडीया ,अनिता इवले ,सोनाली भांडेकर,पूनम ताठे ,सोनाली पुंडे ,अंजली दंडवते ,जोत्स्ना जामगांवकर ,आसावरी नातू ,अश्विनी वाळुंजकर आदिंनी अथर्वशिर्ष पठणास प्रारंभ केला. यावेळी रेखा झंवर व त्यांच्या सहकारी महिलांनी शंखनाद केला.

      या अथर्वशिर्ष मध्ये असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या. पारंपारिक वेशभुषा, एक ताल-सुरात अथर्वशिर्षने परिसर  दुमदुमून गेला होता. यावेळी देवस्थान ट्रस्टच्यावतीने प्रातिनिधीक स्वरुपात महिलांचा सन्मान केला, त्यानंतर महाआरती करुन प्रसाद वाटपाने सांगता झाली. या अथर्वशीर्ष साठी  नितीन पुंड, आण्णा चौधरी,प्रणित अनमल, राजेश एकाडे,राजू जग्गी ,गणेश पालवे, वैभव जगताप , सतीश पठारे , किशोर सुडके ,संदीप बेरड ,प्रदीप झोडगे ,राहुल धोकरिया .,गणेश  आंबेकर , सुधीर सूळ , सुहास दुर्गे, विनायक कानडे, बाळासाहेब व्यापारी, गिरीश पुप्पाल ,चंद्रकांत फुलारी आदिंनी सहकार्य केले.

     याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्‍वस्त पांडूरंग नन्नवरे, विजय कोथिंबीरे, रंगनाथ फुलसौंदर, बापूसाहेब एकाडे ,चंद्रकांत फुलारी, , माणिकराव विधाते, संजय चाफे, नितिन पुंड आदिंसह पुजारी संगमनाथ महाराज उपस्थित होते. यावेळी सरोज पालडीया यांनी आपल्या मधुर गायनाने मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विना दिघे यांनी केले. तर आभार अ‍ॅड.अभय आगरकर यांनी मानले. प्रास्तविक नितीन पुंड यांनी केले यावेळी उपस्थित सर्व महिलांच्या हस्ते सामूहिक महाआरती करण्यात आली तर मुकुंद शास्त्री मुळे यांनी प्रार्थना करून सांगता केली 

COMMENTS