Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्परतेमुळे रोडवर जबरी चोरी करणारा अट्टल गुन्हेगार पकडला

केज : जिल्ह्यातील चोरी, घरफोडी, जबरी चोरी व दरोडा इत्यादी गंभीर गुन्ह्यांवर लक्ष ठेवत स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करून एक जबरदस्त अटक के

केज नगरपंचायतीचे रणशिंग फुंकले! युवा नेते रणजित आडसकर यांच्या एन्ट्रीने राजकीय समीकरणे बदलणार?
निःस्वार्थ सामाजिक कार्याची दखल; पुजा देवळेकर यांना ‘समाजभूषण’ सन्मान
रंगभूमी : समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम; जागतिक रंगभूमी दिन – 27 मार्चमराठी नाटकांची परंपरा, प्रवास आणि वर्तमानाचा सखोल वेध

केज : जिल्ह्यातील चोरी, घरफोडी, जबरी चोरी व दरोडा इत्यादी गंभीर गुन्ह्यांवर लक्ष ठेवत स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करून एक जबरदस्त अटक केली आहे. दि. 23 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 06.15 वाजता फिर्यादी बाळासाहेब सोपानराव घुले (रा. समतानगर, केज) हे शहरातून पायी त्यांच्या दुकानाकडे जात असताना, प्रशांत बिअरबारसमोर मोबाईल फोनवर बोलत असताना, दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या पाठीमागून गाडीवर येवून मोबाईल फोन आणि रु. 2,000/- रोख जबरीने चोरले. फिर्यादींच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे केज येथे गु.र.नं. 149/2026 कलम 309 (4), 3(5) भान्यासारखा गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलीस अधीक्षक बीड, श्री. नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक, श्रीमती चेतना तिडके व पोलीस निरीक्षक, श्री. शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने व त्यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरु केला. गोपनीय माहितीच्या आधारे तपासात समोर आले की, हा गुन्हा आवेज खाजा शेख (रा. कोकीसपीर, केज) आणि सोहेल मोहंमद शेख (अजिजपुरा, केज) यांनी एकत्रितपणे केला आहे. 25 मार्च 2026 रोजी धारुर रोडजवळील श्रेया बिअरबारजवळ आवेज शेख यास ताब्यात घेण्यात आले. अटक केलेल्या आरोपीने कबुल केले की, हा गुन्हा त्याने आणि त्याच्या साथीदाराने केला आहे. तपासात चोरीला गेलेला मोबाईल फोन (किंमत रु. 1,20,000/-) जप्त करण्यात आला, तर सोहेल शेखकडे असलेला चोरीचा मुद्देमाल देखील मिळवला गेला. सध्या फरार आरोपी सोहेल शेख याचा शोध सुरू आहे. आवेज शेख यावर पूर्वीही जबरी चोरी, खुन, खुनाचा प्रयत्न, चोरी यासारखे गंभीर गुन्हे नोंदलेले आहेत, ज्यामुळे पोलीस प्रशासन सतर्कतेने त्याची कारवाई करत आहे. स्थानिक गुन्हे शाखेने त्वरित कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले, कबुली घेतली आणि चोरीचा मुद्देमाल जप्त केला, ज्यामुळे नागरिकांना पोलिसांवरील विश्वास दृढ झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे टीम सदस्य: पोउपनि महेश विघ्ने, पोह/महेश जोगदंड, पोह/दिलीप गित्ते चापोह / गणेश मराडे, पोलीस अधीक्षक बीड व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची ही कामगिरी नागरिकांसाठी आदर्श ठरली आहे.

COMMENTS