वाशिम जिल्ह्यातील औरंगाबाद-नागपूर द्रूतगती मार्गावर भीषण अपघात

Homeताज्या बातम्या

वाशिम जिल्ह्यातील औरंगाबाद-नागपूर द्रूतगती मार्गावर भीषण अपघात

ट्रकचे चाक शरीरावरुन गेल्यामुळे मायलेकाचा अपघातामध्ये जागीच मृत्यू

वाशिम प्रतिनिधी - वाशिम जिल्ह्यातील औरंगाबाद-नागपूर द्रूतगती मार्गावरील वाई फाट्याजवळ भीषण अपघात घडला.आई आणि मुलगा दुचाकीवरुन बाजारात जायला निघाले ह

भयानक ! बस दरीत कोसळून शाळकरी मुलांसह 16 जणांचा मृत्यू
एक्सप्रेसवर कंटेनरचा झाला ब्रेक फेल
परीक्षेहून परतणाऱ्या ३ विद्यार्थीनींवर काळाचा घाला 

वाशिम प्रतिनिधी – वाशिम जिल्ह्यातील औरंगाबाद-नागपूर द्रूतगती मार्गावरील वाई फाट्याजवळ भीषण अपघात घडला.आई आणि मुलगा दुचाकीवरुन बाजारात जायला निघाले होते. त्यावेळी समोरुन येत असलेल्या एका भरधाव ट्रकने बाईकला जबर धडक दिली.ट्रकची चाकं शरीरावरुन गेल्यामुळे मायलेकाचा या अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला. दोघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावरच पडून होते. या अपघातानंतर हायवेवर लोकांनी एकच गर्दी केली होती. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा पंचनामा केला. त्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. चंद्रकला शांताराम करवते असं मृत आईचे नाव असून वसंता शांताराम करवते, असं मुलाचं नाव आहे. 

COMMENTS