Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

होर्मुझ मार्गात तणाव ; दोन जहाजांवर हल्ले

अबुधाबी : पश्‍चिम आशियातील अतिसंवेदनशील मानल्या जाणार्‍या होर्मुज जलसंधीत पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला असून काही तासांच्या अंतरात दोन वेगवेगळ्या

आखातात युद्धाचा भडका! इराणकडून भारतीय खलाशी असलेल्या टँकरवर गोळीबार
एलपीजी ग्राहकांसाठी १ मे पासून नवे नियम! सिलिंडरसाठी OTP अनिवार्य; दरात वाढ आणि बुकिंगच्या नियमांतही मोठे बदल!
ट्रम्प यांचा यू टर्न; इराणसोबत करार करण्याचे संकेत

अबुधाबी : पश्‍चिम आशियातील अतिसंवेदनशील मानल्या जाणार्‍या होर्मुज जलसंधीत पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला असून काही तासांच्या अंतरात दोन वेगवेगळ्या जहाजांवर हल्ले झाल्याच्या घटनांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली आहे. या घडामोडींमुळे समुद्री सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
ब्रिटनच्या समुद्री सुरक्षा यंत्रणेने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी उशिरा रात्री सुमारे अकरा वाजून चाळीस मिनिटांनी संयुक्त अरब अमिरातीतील फुजैरा किनार्‍याजवळ एका तेलवाहू जहाजावर अज्ञात क्षेपणास्त्राद्वारे हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजाचे काही किरकोळ नुकसान झाले असले तरी जहाजावरील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच या घटनेमुळे कोणतेही पर्यावरणीय नुकसान झाले नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, हल्ल्यामागील नेमका सूत्रधार कोण, याबाबत अद्याप अधिकृत खुलासा झालेला नाही. यापूर्वीही त्याच दिवशी होर्मुज जलसंधीत दुसर्‍या एका जहाजावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. सलग घडणार्‍या या हल्ल्यांमुळे या समुद्री मार्गातील अस्थिरता अधिकच वाढल्याचे दिसून येत आहे. संबंधित यंत्रणांनी जहाजवाहतुकीला सतर्कतेचा इशारा दिला असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. विशेष म्हणजे, इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर या घटना अधिक गंभीर मानल्या जात आहेत. या भागात पूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या असून त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय संबंधांवर झाला होता. तज्ज्ञांच्या मते, होर्मुज जलसंधी हा जगातील सर्वाधिक महत्त्वाचा तेलवाहतुकीचा मार्ग आहे. दररोज मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची वाहतूक याच मार्गाने होत असल्याने येथे उद्भवणारी कोणतीही अडचण किंवा हल्ला जागतिक बाजारपेठ, इंधनदर आणि समुद्री व्यापारावर दूरगामी परिणाम करू शकतो. त्यामुळे या भागातील सुरक्षितता राखणे हे जागतिक स्तरावर अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. या घटनांनंतर विविध देशांकडून चिंता व्यक्त करण्यात येत असून पुढील काळात या भागातील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS