Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसकडून 1 एप्रिल मोदीजींच्या विकासाचा जन्मदिवस म्हणून साजरा

इस्लामपूर : मोदी सरकारचा निषेध नोंदविताना संग्राम जाधव, देवराज देशमुख, सचिन कोळी, स्वरूप मोरे, रोहन देसाई. इस्लामपूर / प्रतिनिधी : एप्रिल फुल म्हं

दि. बा. पाटील यांची अखिल भारतीय शिव-मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड
सज्जनगडावरील समाधी मंदिर विद्युत रोषणाईने उजळले
मनसे कार्यकर्ता खूनप्रकरणी जळगावच्या पाचजणांना अटक

इस्लामपूर / प्रतिनिधी : एप्रिल फुल म्हंटले की, मोठा विनोद, गंमत आणि थट्टाही. भाजपाचे केंद्र सरकार आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या कारकिर्दीत विकास आणि त्यांनी दिलेल्या आश्‍वासनांची परिपूर्तता हा मोठा विनोद बनला आहे. त्यामुळे वाळवा तालुका व इस्लामपूर शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूर येथे 1 एप्रिल हा मोदीजींच्या विकासाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला. यातून त्यांनी अनोख्या पध्दतीने केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला. तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, कार्याध्यक्ष देवराज देशमुख, शहराध्यक्ष सचिन कोळी, कार्याध्यक्ष स्वरूप मोरे, विद्यार्थी अध्यक्ष रोहन देसाई यांनी अनोख्या आंदोलनाचे नेतृत्व केले.
याप्रसंगी संग्राम जाधव व देवराज देशमुख यांनी मोदी सरकारने देशातील जनतेची फसवणूक करत महागाई, बेरोजगारी, पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढ, नोटा बंदीतून झालेल्या अच्छेदिनाची चर्चा करत संपूर्ण राज्यात मोदी सरकारचा 1 एप्रिल रोजी अनोख्या स्टाईलने निषेध नोंदवत असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी नितीन पाटील, सचिन पाटील, अजित बेनाडे, विश्‍वजित पाटील, अविनाश फाळके, माणिक पाटील, संदीप पाटील, विक्रम पाटील, विनायक यादव, प्रविण पाटील, महेश पाटील, अभिजित पाटील, आसिफ पटेल, सुनील शेटे, प्रशांत रणदिवेे, विश्‍वास कदम, प्रमोद पाटील, श्रीकांत बारपटे, दिग्विजय माने, अभिजित पाटील, सौरभ चव्हाण, तुषार पाटील, सुधीर राबाडे, अनिकेत पाटील, शुभम पाटील, सुशांत पाटील, सुधीर शेटे, किरण पाटील, रोहित तोरस्कर, लखन पवार, पृथ्वीराज पाटील यांच्यासह युवक अनोख्या आंदोलनात सहभागी झाले होते.

COMMENTS