हिंदूत्वाची ताकद तुम्ही गोठवली ; उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंदूत्वाची ताकद तुम्ही गोठवली ; उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका

मुंबई/प्रतिनिधी :शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर त्याचे पडसाद उमटतांना दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांनी रविवारी कार्य

शिवसेनेचे गोंधळलेले राजकारण
धगधगती मशाल ठाकरे गटाचे नवे चिन्ह; पक्षाचे नाव ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’
‘होम ग्राउंड’वरच मनसेला मोठा झटका… नेत्यांसह कार्यकर्त्यांनी हाती बांधले ‘शिवबंधन’

मुंबई/प्रतिनिधी :शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर त्याचे पडसाद उमटतांना दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांनी रविवारी कार्यकर्त्यांशी फेसबुकद्वारे लाईव्ह संवाद साधत शिंदे गटावर कडाडून हल्ला केला. तुम्ही केवळ धनुष्यबाण चिन्हच नाही गोठवलं, तर तुम्ही हिंदूत्वाची ताकद गोठवली. ज्या शिवसेनेने मराठी माणसाला आधार दिला, मराठी मने पेटवली आणि हिंदू अस्मिता जपली, तिचा घात करायला निघालात. शिवसेना हे पवित्र नाव गोठवले. या देशात हिंदू म्हणायची कुणाला हिंमत नव्हती, तेव्हा बाळासाहेबांनी ती दिली. ती हिंदूत्वाची हिंमत तुम्ही गोठवली, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
आपल्याशी काही जणांनी गद्दारी केली. मुख्यमंत्रीपदी ज्यांना पाहिजे होते, त्यांनी ते घेतले. ज्यांना सर्वकाही दिले, तेही गेले. आपण काय बोललो नाही. मात्र, आता अति होत असून, शिवसेनाप्रमुख व्हायला निघाले आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर टीका केली आहे. निवडणूक आयोगाने निपक्षपातीपणाने राहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. अंधेरीची पोटनिवडणूक लागली असून, चार दिवसांत अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर एक चिन्ह आणि एक नाव द्या. निवडणूक आयोगाने शिवसेनेने दिलेली तीन चिन्ह आणि तीन नावे जनतेला सांगितली आहेत. मात्र, शिंदे गटाने काय सादर केले, याची माहिती दिली नाही, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

ठाकरेंकडून तीन चिन्ह आणि तीन नावांचा प्रस्ताव
शिवसेनेकडून तीन चिन्ह आणि तीन नावांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे देण्यात आला आहे. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी माहिती दिली आहे. उद्धव ठाकरेंनी राज्यातील शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले, त्रिशुळ, मशाल आणि उगवत्या सूर्याच्या चिन्हाचा पर्याय निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. त्याचसोबत ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना प्रबोधनकार ठाकरे’ आणि ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ अशी तीन नावेही निवडणूक आयोगाला सुचवण्यात आली आहेत, असे उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

चाळीस डोक्यांच्या रावणाने धनुष्यबाण गोठवले
निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवले. चाळीस डोक्याच्या रावणाने धनुष्यबाण गोठवले. उलट्या काळजाची माणसे आणि कंपू फिरतोय. त्यांनी कट्यार आईच्या काळजात घुसवली. याचा आनंद त्यांच्या महाशक्तीला झाला असेल, अशा कठोर शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

COMMENTS