Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुलांच्या दिल्ली, ओरिसा, गुजरात; मुलींच्या हरियाणा, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशचे संघ विजयी

इस्लामपूर : मुलांच्या पंजाब विरुध्इ हरियाणा संघातील अटी-तटीच्या सामन्यातील एक क्षण. इस्लामपूर / प्रतिनिधी : मुलांच्या दिल्ली विरुध्द राजस्थान, ओरि

अवघ्या दहा तासात मोटरसायकल चोरास अटक
दुय्यम निबंधक कार्यालयातील लिपिकावर कारवाई
बॉर्डर दौड स्पर्धेत वडजलच्या सौ. तृप्ती काटकर-चव्हाण प्रथम

इस्लामपूर / प्रतिनिधी : मुलांच्या दिल्ली विरुध्द राजस्थान, ओरिसा विरुध्द गुजरात, कर्नाटक विरुध्द गुजरात, तर मुलींच्या हरियाणा विरुध्द राजस्थान, मध्य प्रदेश विरुध्द बिहार, आंध्र प्रदेश विरुध्द तामिळनाडू या संघात शेवटच्या सेटपर्यंत निकराची झुंज होवून मुलांच्या दिल्ली, ओरिसा, गुजरात, मुलींच्या हरियाणा, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश या संघांनी प्रतिस्पर्धी संघांना पराभूत केले आहे. आज (शनिवार) पासून बाद फेरीत सामने होणार असल्याने स्पर्धेची रंगत अधिकच वाढणार आहे. राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 24 व्या युथ राष्ट्रीय व्हॅलीबॉल पुरुष व महिलांच्या स्पर्धेत तीन दिवसांचा खेळ मोठ्या उत्साहात झाला.
मुलांच्या पंजाब व हरियाणा, ओरिसा व पाँडीचेरी, उत्तर प्रदेश व कर्नाटक, झारखंड व तेलंगणा या संघातही जोरदार लढत होऊन पंजाब, ओरिसा, उत्तर प्रदेश व झारखंडने 3-1 सेटनी विजय मिळविला आहे. तसेच बिहारने झारखंड व मध्य प्रदेशला, दिल्लीने मध्य प्रदेशला, केरळने जम्मू काश्मीरला, तामिळनाडूने चंदीगडला, हिमाचल प्रदेशने पश्‍चिम बंगालला सरळ 3 सेटनी हरविले.
मुलींच्या हरियाणाने बिहारला, केरळने चंदीगड व कर्नाटकला, पश्‍चिम बंगालने झारखंडला, आंध्र प्रदेशने तेलंगणाला, गुजरातने तामिळनाडूला, चंदीगडने उत्तर प्रदेशला सरळ 3 सेटनी मात दिली आहे. पहिले 3 दिवस मुलांच्या व मुलींच्या 4 गटात साखळी पध्दतीने सामने झाले आहेत. आता आजपासून तुल्यबळ संघांमध्ये बाद फेरीचे सामने होणार आहेत.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांनी स्पर्धेस भेट दिली. उद्योगपती सुरेंद्र पाटील, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, प्रांताधिकारी डॉ. संपतराव खिलारी, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, गट शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, प्रा. शामराव पाटील, आर. डी. सावंत, पै. भगवान पाटील, दादासो पाटील यांच्यासह हजारो क्रीडा रसिकांनी खेळाचा मनमुराद आनंद लुटला.
इस्लामपूरचा व्हॉलीबॉल खेळाचा समृध्द वारसा
इस्लामपूरच्या श्रावणी प्रताप पाटील, सुप्रिया जालिंदर साळुंखे या महाराष्ट्राच्या मुलींच्या संघातून खेळत आहेत. महंमद साब मुल्ला, स्व. सत्तारभाई खाटीक यांनी भारतीय संघातून, तर स्व. मधुकर पाटील, स्व. शिवाजी भोसले, स्व. संभाजी भोसले, कादर वाठारकर, बकस खाटीक यांच्यासह अनेक खेळाडूंनी राज्याच्या संघातून प्रतिनिधित्व केले आहे. एक काळ होता, देशाच्या संघात निम्मे खेळाडू या शहरातील होते. या शहराने यापूर्वी पाच वेळा राज्य अजिंक्य पद व निवड चाचणी स्पर्धा यशस्वीपणे घेतल्या आहेत. स्व. सुधीर पिसे यांनी राज्य संघटनेचे अध्यक्षपद भूषविले आहे. इस्लामपूर हे शहर व्हॉलीबॉल पंढरी म्हणून ओळखले जाते.

COMMENTS